मुंबई : काही महिन्यांपूर्वी अभिनेता इरफान खान आणि आता सोनाली बेंद्रेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कॅन्सरचा सामना करत असल्याचे वृत्त जाहीर केले आहे. कलाकारांप्रमाणेच सामान्य लोकांमध्येही कॅन्सर जडण्याचं प्रमाण वाढलं आहे. धकाधकीच्या बनत चाललेल्या आपल्या जीवनशैलीमुळे लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावत आहे. अशापैकी एक म्हणजे कॅन्सर. कॅन्सर या आजाराचे नाव ऐकूनच अनेकांच्या मनात धडकी भरते. कॅन्सरचे उपचार वेदनादायी असल्याने त्यावर मात करण्यासाठी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं गरजेचे आहे.
High Grade Cancer मध्ये शरीरात कॅन्सर पसरण्याचे प्रमाण अधिक वेगाने होत असते त्यामुळे औषधांचा, उपचारांचा होणारा मारा सहन करण्यासाठी शरीराला अधिक मजबूत करण्याची गरज असते. सोनाली बेंंद्रे सामना करत असलेला High Grade Cancer म्हणजे नेमके काय ?
आहारात नियमित ताजी फळं, भाज्या आणि धान्यांचा समावेश वाढवावा.
आठवड्यातून किमान तीन वेळेस आहारात डाळी, कडधान्यांचा समावेश वाढवावा.
मसल्स वेस्टिंग टाळण्यासाठी आहारात प्रोटीन रिच पदार्थांचा समावेश वाढवा.
उपचारांमुळे थकवा, मरगळ, वजन घटणं हा दुष्परिणाम दिसतात. ते टाळण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात कॅलरीजचा समावेश करा.
कॅन्सरच्या उपचारानंतर तोंडाची चव जाते. अशावेळेस थोड्या थोड्या वेळाने खात रहा. दिवसातून दोन वेळेस जेवणं शक्य नसते अशावेळेस दिवसभरात 5-6 लहान मिल्स ठरवा.
जेवणं तुम्हांला शक्य नसेल तर मिल्क शेक, स्मुदी किंवा सूप्सचा आहारात समावेश करा.
आहार लो फॅट फूड्स, डिंक्सचा समावेश करा. तेलाची निवड करतानाही काळजी घ्या.
दिवसातून 2-3 कप ग्रीन टी पिण्याची सवय ठेवा.
तुमच्या प्रकृतीनुसार, तज्ञांकडून न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सचा समावेश करा. सावधान ! नेहमीच्या सवयीतील या '5' गोष्टी नकळत वाढवतात कॅन्सरचा धोका
अति साखरयुक्त पेय टाळा. ज्या पदार्थांमध्ये फ्रुक्टोज कॉर्न सिरप अधिक प्रमाणात असेल असे पदार्थ टाळा.
आहारात मीठाचं प्रमाण किती असावं हे गणित सांभाळा.
प्रोसेसड, प्रि-प्रिपेड, डब्बाबंद पदार्थ विकत घेणं, खाणं टाळा.
रेड मीटचं सेवन टाळा.
तुमचा कॅन्सर हा हार्मोनली ड्रिव्हन ( ब्रेस्ट, प्रोस्टेट किंवा आतड्यांचा ) असेल तर गाईच्या दूधापासून बनलेले पदार्थ टाळावेत असा सल्ला दिला जातो. कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यासाठी आहारात हवेच हे '5' पदार्थ
महत्त्वाची टीप - हा सल्ला केवळ मदतीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शारिरीक स्थितीनुसार त्यांना आवश्यक असलेले डाएट वेगवेगळे असू शकते. त्यामुळे तुम्ही कॅन्सरचा सामना करत असल्यास योग्य आहारतज्ञांच्या मदतीने उपचार आणि तुमच्या आहाराचं पथ्यपाणी सांंभाळणं गरजेचे आहे. त्यानुसार तुमचा आहार ठरवा.