Normal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?

Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का? 

Updated: Dec 15, 2022, 05:08 PM IST
Normal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?  title=
what is the normal hemoglobin range for all age groups

Normal Hemoglobin Level​ : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो, कधीकधी आजारी असताना एखादी चाचणी केल्यानंतर आपणही याच वाक्यांचा पुनरुच्चार करतो. पण, कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का? hemoglobin म्हणजे शरीरातील तांबड्या पेशींमध्ये असणारं प्रोटीन Molcule. (what is the normal hemoglobin range for all age groups )

फुफ्फुसांमध्ये (lungs) असणारा ऑक्सिजन (oxygen) शरीरातील इतर पेशींना पुरवून त्यातील कार्बन डायऑक्साईच फुफ्फुसांपर्यंत पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. सहसा काही महत्त्वाच्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. रक्तातील Iron ची कमतरता यामागचं मुख्य कारण असतं. त्यामुळं रक्तात या घटकाचं प्रमाण संतुलित असणं अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. 

वयोमनानुसार हिमोग्लोबिनची संतुलित पातळी किती असावी? 

पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्ती (स्त्री)- 11.7 ते 13.8 ग्राम 
पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्ती (पुरुष)- 12.4 ते 14.9 ग्राम 
तरुणी- 12 ते 16 ग्राम 
तरुण- 14 ते 18 ग्राम 
लहान मुलं- 11 ते 13 ग्राम 
1 महिन्याचं मुल- 11 ते 15 ग्राम 
1 आठवड्याचं मुल- 15 ते 20 ग्राम 
नवजात शिशू- 17 ते 22 ग्राम 

हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास... (hemoglobin defeciency)

हिमोग्लोबिन कमी झाल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होऊ लागते. ज्यामुळं Anemia होण्याची भीती असते. हिमोग्लोबिनचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्यास त्यामुळं किडनीचे विकार, अर्धांगवायू यांसारख्या व्याधी होऊ शकतात. प्राथमिक स्तरावर वारंवार सुस्ती येणं, चक्कर येणं, त्वचा पिवळी पडणं अशी लक्षणं हिमोग्लोबिन कमी असल्यास दिसू शकतात. 

हेसुद्धा वाचा : Health Tips : चालताना त्रास होतो का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

हिमोग्लोबिन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं? (How to control hemoglobin )
रक्तातील हा अतिशय महत्त्वाचा घटक नियंत्रणात ठेवण्यासाठी बीट, बीटचा रस, काळ्या मनुका, पेरु, सफरचंद आणि आंबा खावा. शिवाय पालेभाज्या, तीळ, पालक, दूध, अंडी, नारळ, मोड आलेलं कडधान्ययुक्त आहाराचं सेवन करावं.