Morning vs Evening Best Time To Workout: हेल्दी राहण्यासाठी वर्कआऊट अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण रोजच ऐकत असतो. कारण आपल्यापैकी अनेकजण फिटनेस फ्रिक असाल. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जातात. पण या सगळ्यात काही जण सकाळी एक्सरसाईज करतात तर काही जणांना संध्याकाळी जिंमिंग करायला आवडतं. पण फिट राहण्यासाठी कोणत्या वेळेतला वर्कआऊट जास्त फायदेशीर ठरतो. याकरता आम्ही एक्सपर्टचा सल्ला घेतला की, कोणत्या वेळेचा वर्कआऊट अधिक फायदेशीर ठरतो.
मॉर्निंग वर्कआईट चयापचय वाढवते आणि मूड देखील सुधारतो? यासोबतच झोपेची गुणवत्ताही सुधारते. एक्सपर्ट सांगतात की, एखाद्या व्यक्तीने आपल्या आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी शरीराचे संकेत ऐकले पाहिजेत. तुम्हाला दोन्ही वेळेला वर्कआऊट केल्यानंतर शरीरात होणारे बदल ओळखता आले पाहिजेत.
संध्याकाळच्या वर्कआउटमुळे ऍक्टिवनेस सुधारतो आणि शरीराला ताकदही मिळते. संध्याकाळची कसरत केल्याने, एखादी व्यक्ती तणावमुक्त होते आणि त्याला दिवसभरातील आव्हानांपासून आराम मिळण्याची संधी मिळते. सामर्थ्य आणि लवचिकतेवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्यांसाठी संध्याकाळी व्यायाम अधिक फायदेशीर ठरू शकतो. तसेच काही लोकांना दिवस संपताना व्यायाम केल्यास थोडा थकवा जाणवू शकतो. अशावेळी दिवसा केलेला वर्कआऊट अतिशय उत्तम असतो.
कोविडच्या काळात जिम आणि फिटनेस ॲक्टिव्हिटी बंद झाल्यामुळे लोकांना घरीच वर्कआउट करण्याची सवय लागली आहे. फिटेलोच्या सर्वेक्षण 'स्टेट ऑफ युवर प्लेट' नुसार, बहुतेक लोक घरी हलका व्यायाम (46%) किंवा चालणे (55%) पसंत करतात. त्याच वेळी, 58% महिला योग, झुंबा आणि नृत्य करतात. याशिवाय 45 टक्के पुरुषांना जिममध्ये जाणे, धावणे आणि जॉगिंग करणे आवडते. महाकदीप म्हणतात की, लोकांना वेळेची पर्वा न करता सातत्यपूर्ण वर्कआउट रूटीन राखण्यासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे, कारण हे दीर्घकालीन फिटनेस उद्दिष्टांसाठी महत्त्वाचे आहे.