फक्त 1 महिना साखर नाही खाल्ली तर काय होईल? परिणाम वाचून व्हाल थक्क

What Happens If You Leave Sugar For A Month: तशी सगळ्याच पदार्थांमध्ये साखर कमी अधिक प्रमाणात असते. मात्र फळं, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांमधून नैसर्गिकरित्या मिळणारी साखर ही आरोग्यासाठी फार फायद्याची मानली जाते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 18, 2023, 01:55 PM IST
फक्त 1 महिना साखर नाही खाल्ली तर काय होईल? परिणाम वाचून व्हाल थक्क title=
आरोग्यावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या दौनंदिन वापरातील गोष्ट म्हणजे साखर

What Happens If You Leave Sugar For A Month: व्हायरल आजारांच्या लाटेमध्ये आजारी पडणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या जीवनशैलीमधील बदल आणि जेवणाच्या बदलेल्या सवयी. जेवणासंदर्भातील सवयी योग्य नसतील तर अनेक आजारांना आपण स्वत: आमंत्रण देतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मात्र शरीरासाठी नेमकं फायद्याचं काय आणि तोट्याचं काय? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर ठाऊख नसतं. मात्र तोट्याच्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर सर्वात आधी साखरेचा उल्लेख करावा लागेल. साखरेचं सेवन करणं हे आरोग्यासाठी धोकादायक असतं. 

नैसर्गिक साखर अधिक उत्तम

हल्ली अनेकजण आपल्या आरोग्यासंदर्भात भरपूर जागृक झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी अनेकजण आज मेहनत घेताना दिसतात. मात्र तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर साखरेचं सेवन कमी केलं पाहिजे. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने टाइप 2 डायबेटिजचा, फॅटी लिव्हर आणि हृदयासंदर्भातील समस्या निर्माण होतात. अतिरिक्त किंवा अनैसर्गिक साखरेऐवजी नैसर्गिक साखर असलेले पदार्थ म्हणजे फळं, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. या पदार्थांमुळे शरीराला फार फायदे होतात.

साखर सोडली तर काय?

खरं तर अनेक पदार्थांमध्ये कमी अधिक प्रमाणात साखर असते. मात्र केवळ एका महिन्यासाठी म्हणजेच 30 दिवसांसाठी साखरेचं सेवन बंद केलं तर काय होईल तुम्हाला ठाऊक आहे का? आपण या लेखामधून हेच जाणून घेणार आहोत की एक महिना साखर खाल्ली नाही तर नेमकं काय होईल? जाणून घेऊयात...

रक्तातील साखर :

साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचं सातत्याने सेवन केल्यास टाइप 2 डायबेटिजचा धोका वाढतो. तुम्ही साखरेचं सेवन केलं नाही तर रक्तामधील साखरेचं प्रमाण कमी होईल. तसेच इन्शुलिनचा स्तर नियमित करण्यासाठी फार फायदा होईल.

वजन :

जेवणाच्या सवयींमध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाल्याने वजन वाढत असल्याची समस्या अनेकांना जाणवू लागली आहे. अधिक वजन असल्याची समस्या असलेल्यांच्या जेवणामध्ये साखर अधिक प्रमाणात असते. या साखरेमुळे शरीरामधील फॅट्सचं प्रमाण वाढतं. साखर खायचं सोडल्यास वजन मोठ्या प्रमाणात कमी होईल. 

तोंडाचे आरोग्य :

आपल्या दातांसाठीही साखरेपासून बनवलेले पदार्थ फार हानीकारक असतात. याचा थेट संबंध कॅव्हिटी आणि दाढीसंदर्भातील समस्यांशी असतो. साखरेपासून तुम्ही फारकत घेतली तर दात अधिक मजबूत आणि साफ राहण्यास मदत होते.

यकृत :

तुम्ही जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ खात असाल तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

हृदयासंदर्भातील समस्या -

मानवी शरीरामधील 2 सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे मेंदू आणि दुसरं हृदय. साखर अधिक प्रमाणात असलेल्या पदार्थांचं सेवन केलं तर हृदयामधील रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. 

(Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)