मुंबई : अनेक लोकांना पाठदुखीची समस्या सारखी उद्भवत असते. यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. परंतु सध्या बहुतांश लोकांना बदलत्या जीवनशैलीमुळे पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायाम न केल्यामुळे वयाच्या ३० वर्षापूर्वीच तरुणांना पाठदुखीची तक्रार सुरू होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्या 4 मोठ्या कारणांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लोकांना पाठीदुखीची समस्या उद्भवते.
पाठदुखीची कारणं जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकेल.
पाठदुखीचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्यायाम न करणे. बदलत्या आणि व्यस्त जीवनात, बहुतेक लोक एकाच जागेवर बसून काम करत असतात, ज्यामुळे त्यांची पाठ दुखते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आयुष्यातील थोडा वेळ व्यायामासाठी काढावा लागेल, अन्यथा तुम्हाला यासंदर्भात मोठी समस्या निर्माण येऊ शकते.
याशिवाय शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळेही पाठदुखीचा त्रास होतो. वास्तविक, जेव्हा तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तेव्हा तुमची हाडे कमकुवत होऊ लागतात आणि अशा स्थितीत तुम्हाला पाठदुखीचा त्रास सुरू होतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त अन्नाचा समावेश केला पाहिजे.
पाण्याची कमतरता हे देखील पाठदुखीचे मोठे कारण असू शकते. शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच, अधिकाधिक पाणी प्या जेणेकरुन तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि कोणत्याही प्रकारे लठ्ठ होऊ देत नाही.
आम्ही तुम्हाला सांगतो की, जे लोक एकाच जागी बसून काम करत राहतात, त्यांनी थोडं इकडे तिकले फिरावं, कारण एका जागेवर बसल्याने देखील तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)