Weight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या

 Lifestyle and Weight :  बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.  

Updated: Aug 31, 2022, 12:10 PM IST
Weight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या title=

मुंबई : Lifestyle and Weight :  बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते. मात्र वजन वाढले तरी जर ते आपल्या उंची आणि वयाप्रमाणे (Weight Compared to Height and Age) किती असावे, याची माहिती नसते.  ठराविक वजनापेक्षा जास्त वजन झाले तर, वजन वाढल्यानंतर लठ्ठपणा, मधुमेह, ब्लडप्रेशर सारखे त्रास व्हायला लागतात. शिवाय स्नायू दुखणे गुडघ्याचे आजारही होतात. एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे वजन वाढते. योग्य वजन  आणि उंची यांच्या आधारे ठरवले जाते. अधिक जाणून घ्या.

तुम्ही योग्य आहार घेतला नाही तर वजन खूप वाढते किंवा आवश्यकतेनुसार कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत लोक त्यांचे वजन नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय करतात. यामध्ये असे काही लोकं आहेत जे स्वत:चं जास्त वजन आहे, असे समजतात आणि वेगवेगळा आहार घेण्यास प्राधान्य देतात. यानंतर त्यांचे वनज कमी होतं मात्र ते योग्य नसते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, निरोगी व्यक्तीचे वजन, वय आणि उंची किती असावी. तज्ज्ञांच्या मते, उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन किती असावे याबाबत माहिती जाणून घ्या. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला सरासरी वयानुसार सांगू, कोणाचं वजन किती असावे. यानुसार तुम्ही लठ्ठ किंवा वजन कमी आहे हे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. 

पाहा उंचीप्रमाणे वजन किती असावे?

4 फूट 10 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 41 ते 52 किलो असावे यापेक्षा जास्त वजन ओव्हरवेटच्या श्रेणीमध्ये येते.
5 फूट उंचीच्या व्यक्तीचं सामान्य वजन 44 ते 55.7 किलो दरम्यान असावे हे निरोगी शरीराचं लक्षण आहे.
5 फूट 2 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं हे वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावे
5 फूट 4 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावे
5 फूट 6 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 53 ते 67 किलो दरम्यान असलं पाहिजे.
5 फूट 8 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 56 ते 71 किलो दरम्यान असलं पाहिजे
5 फूट 10 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 59 ते 75 किलो दरम्यान असावे
6 फूट उंच व्यक्तीचं सामान्य वजन 63 ते 80 किलो दरम्यान असावे