Weight Loss: सर्दीच्या दिवसांत हे 3 सूप करतील वजन कमी

थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आहारात काही सूपचा समावेश करू शकता, ज्यामुळे तुमच्या वजनात घट होऊ शकते. 

Updated: Nov 16, 2022, 08:57 PM IST
Weight Loss: सर्दीच्या दिवसांत हे 3 सूप करतील वजन कमी title=

Weight Loss: थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांची तक्रार असते की, वजनात वाढ होतेय. थंडी लागू नये म्हणून आपण कपड्यांचे थर चढवतो, त्याचप्रमाणे आपण अधिक प्रमाणात खातो देखील. ओव्हर इंटींग प्रमाणे वजन वाढण्याचं कारण आहेच, पण अजून एक कारण म्हणजे मेटाबॉलिझ्म रेट कमी होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहाराकडे अधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे. 

थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आहारात काही सूपचा समावेश करू शकता, ज्यामुळे तुमच्या वजनात घट होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया की, हिवाळ्यात तुम्ही वजन कमी करण्यासाठी कोणतं सूप पिऊ शकता.

टोमॅटो सूप (Tomato soup)

वजन घटवण्याचा करण्याचा त्रास कमी करण्यासाठी सर्दीमध्ये तुम्ही टोमॅटोचं सूप पिऊ शकता. यामध्ये कमी कॅलरी असून त्यात व्हिटॅमीन सी, बीटा कॅरोटीन आणि इतर पोषक घटक असतात, जे तुमच्या शरीरासाठी हेल्दी असतात. त्यामुळे जर तुम्हाला थंडीच्या दिवसांत वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे सूप पिऊ शकता. 

भाज्यांचं सूप (Clear vegetable soup)

सर्व भाज्यांचं तयार केलेलं सूप पोषक तत्त्वांनी भरलेलं असतं. शिवाय यामध्ये कॅलरीजचं प्रमाणंही कमी असतं. यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार, पालक, ब्रोकोली, गाजर, मटार तसचं सिमला मिर्चीचा वापर करू शकता. एक लक्षात ठेवा हे सूप तुम्ही वजन कमी करण्यासाठी पिताय त्यामुळे ते अधिक क्रीमी बनवू नका.

चिकन सूप (Clear chicken soup)

चिकनमध्ये फॅट असतं, मात्र वजन कमी करण्यासाठी हे सूप फायदेशीर ठरू शकतं. चिकनमध्ये प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेट अधिक प्रमाणात असतं. परिणामी कॅलरी देखील कमी असते. या सूप प्यायल्याने भूक शांत होते आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं.