Weight Loss: बारीक कोणाला व्हायचं नसतं... प्रत्येकाची इच्छा असते की आपण स्लिम ट्रीम दिसावं. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट येते ते म्हणजे डाएटींग करावं. असे अनेक व्यक्ती असतात जे वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये ब्रेडचा समावेश करत नाहीत. मात्र तुम्हाला माहितीये का वजन कमी करण्यासाठी आहारात ब्रेडचा समावेश करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
आता तुम्ही म्हणाल, ब्रेडमध्ये काब्रोहायड्रेट असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ब्रेड कसा फायदेशीर ठरू शकतो. याचं उत्तम म्हणडे जर तुम्ही डाएटींग करत असाल तर तुम्ही कोणताही ब्रेड खाऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला ठराविक ब्रेडचीच निवड करावी लागेल. जाणून घेऊया कोणता ब्रेड तुमची डाएटींगसाठी मदत करू शकतो.
हा ब्रेड नेहमीच्या ब्रेडपेक्षा तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. सामान्य ब्रेडमध्ये पोषक तत्वं कमी असतात परिणामी यामुळे वजन वाढतं. पण गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या ब्रेडमध्ये अनेक पोषक घटक असतात आणि त्यामुळे वजन वाढीची समस्या उद्भवत नाही.
अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलंय की, कोणतंही धान्य अंकुरित केल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढतं शिवाय अशी धान्यं खाल्ल्याने शरीराला अधिक पोषक द्रव्यं मिळतात. त्यामुळे स्प्राउटेड ब्रेड जलद वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे इतर आजारांचा धोका देखील कमी होतो.
ओटमील ब्रेडमध्ये फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 1, आयर्न आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय फायबर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आहारात ओटमीलच्या ब्रेडचा समावेश करू शकता.