Weight Loss Diet : क्रिसमस आणि न्यू ईयर (Christmas and New Year 2022) पार्टीसाठी अनेक जण प्लॅन करत आहेत. त्या पार्टीत सगळ्यात सुंदर दिसावे म्हणून अनेक जण वजन कमी करत आहेत. जर तुम्ही वजन कमी (Weight Loss) करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण या वजन कमी करण्याचा डाएटमध्ये (Diet) तुम्हाला मन मारायची गरज नाही. तुम्ही बिनधास्त तुमचे आवडीचे पदार्थ खाऊ शकता. भारतीय खाद्यसंस्कृतीतील (Indian food culture) काही पदार्थ तुम्ही खाऊन जबरदस्त वजन कमी करु शकता.
तुम्ही किटो डाएटबद्दल (Keto diet) ऐकलं असेल. या डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश आहे ज्या पदार्थांवर इतर डाएटमध्ये सक्तीने बंद करण्यास सांगितलं जातं. वजन कमी करायचं म्हणजे पहिले आवडीचे पदार्थांवर बंदी...पण किटो डाएटमध्ये उलटं आहे. एका अहवालानुसार भारतीय संस्कृतीतील (low-carb Indian foods) पाच पदार्थांचा केटो डाएटमध्ये समावेश करण्यात आला आहे. केटो डाएटमध्ये प्रथिनांवर अधिक लक्ष केंद्रीत केलं जातं. असं मानलं जातं की, या डाएटमुळे शरीरातील कर्बोदकांच्या ज्वलनापासून ऊर्जा निर्माण होते ज्यातून तुमची चरबी जाळण्यासाठी मदत होते. त्यामुळे भारतीय खाद्य पर्यायांचा वापर करुन तुम्ही वजन कमी करु शकता.
आजकाल किटो डाएटचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे आणि बरेच लोक ते फॉलो करत आहेत. केटोजेनिक किंवा किटो आहारामध्ये कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांना प्राधान्य दिलं जातं. या डाएटमध्ये शरीरातील साठलेल्या चरबीपासून ऊर्जा निमार्ण केली जाते. म्हणजे या डाएटमध्ये तुम्हाला एका दिवसात फक्त 30 ते 50 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स खायचे आहे. (weight loss diet you can enjoy indian recipes Butter Chicken Palak Paneer on Keto diet)
भारतीय पदार्थांमध्ये असे काही पदार्थ आहे ज्यामध्ये क्लासिक लो कार्ब आहे आणि हे पदार्थ किटो डाएटसाठी बेस्ट (keto-friendly foods) आहेत. त्यामुळ वजन कमी करण्यासाठी आता तुम्ही बिनधास्त हे पदार्थ खाऊ शकता. तर ते कुठले पदार्थ आहे चला जाणून घेऊयात. (which Indian foods are keto-friendly?)
किटो डाएटसाठी योग्य पदार्थ...हा पदार्थ खाल्ल्यामुळे जलदगतीने तुमच्या शरीरात प्रोटीन आणि फॅट (proteins and fats) तयार करतं. आता भारतीयांना वजन कमी करायचं असेल तर बिनधास्त बटर चिकन खाऊ शकता.
शाकाहारी लोकांच्या सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर भुर्जी...युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (USDA) च्या आकडेवारीनुसार, कॉटेज चीजच्या 100 ग्रॅम भागामध्ये फक्त 3.4 ग्रॅम कर्बोदके आणि 11 ग्रॅम प्रथिने असतात.
आणखी एक भारतीय पनीर डिश जी सर्वांना आवडते. USDA च्या आकडेवारीनुसार 100 ग्रॅम पालकमध्ये फक्त 3.6 ग्रॅम कर्बोदके असतात. त्यामुळे किटो डाएटनुसार वजन कमी करण्यासाठी पालक पनीर बेस्ट डिश आहे.
किटो डाएटमधील अजून एक भारतीय डिश...तर तुम्ही दाळ मखनीमध्ये उडीद काळ्या डाळीच्या जागी चिरोंजीच्या दाण्यांसह आणि कर्बोदकांचे प्रमाण अल्प प्रमाणात केले तर ही वजन कमी करण्यासाठी बेस्ट डिश आहे.
भारतात असंख्य लोक आहेत ज्यांना डोसा हा पदार्थ खूप आवडतो. जर तुम्ही कार्बोहायड्रेट-युक्त तांदळाच्या पिठाच्या जागी लो-कार्ब बदामाच्या पिठाचा वापर केल्यास तुम्ही वजन कमी करु शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)