मुंबई : आपण ब-याचदा रात्री येणा-या खोकल्याच्या समस्येने हैराण होतो.
खोकल्यामुळे आपण नीट झोपू देखील शकत नाही.रात्री येणारा खोकला अनेक समस्यांना आमंत्रण करतो.अपुरी झोप, चिडचिड,अस्वस्थता, मूत्रमार्गातील समस्या आणि दैनंदिन कामामध्ये काही अडचणी आल्यास रात्री खोकल्याची समस्या अधिक वाढते.
तुम्हांला देखील रात्री झोपताना खोकला येत असल्यास या टीप्स जरुर करा.
खोकला हा घसा व श्वासनलिका यांच्यामध्ये असलेल्या अडथळ्यामुळे निर्माण होतो.यासाठी नेहमी झोपताना उशी घेऊनच झोपा.असे केल्याने तुमच्या घश्यामध्ये द्रवपदार्थ येणार नाहीत व तुमची खोकला येण्याची समस्या कमी होईल.
काही संशोधनानूसार पाठीवर झोपल्याने झोपेतील अर्धांगवायू,स्ट्रोक,दमा आणि श्वसनक्रिया बंद होण्याची समस्या निर्माण होते.असे झोपल्यामुळे फुफ्फुसांवर ताण येतो ज्यामुळे श्वास घेण्याची क्रिया जलद होते व खोकला येतो.पोटावर झोपल्याने हा खोकला कमी होऊ शकतो मात्र जर वाढलेल्या वजनामुळे तुमचे पोट सुटलेले असेल तर तुम्ही असे झोपू शकत नाही.यासाठी कुशीवर झोपणे हाच तुमच्यासाठी एकमेव उत्तम मार्ग आहे.