दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? मग रोज 'या' ड्रिंकचं सेवन करा; 10 दिवसात दिसेल परिणाम

Weight Loss Drink : इथे प्रत्येकाला वाटतं आपण फिट आणि आकर्षक दिसावं. त्यात आता दिवाळी येणार आहे, अशात तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आम्ही तुम्हाला एक जबरदस्त ड्रिंक सांगणार आहोत.  त्याचा सेवनाने तुम्हाला फायदा मिळेल. 

नेहा चौधरी | Updated: Oct 20, 2024, 08:24 AM IST
दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? मग रोज 'या' ड्रिंकचं सेवन करा; 10 दिवसात दिसेल परिणाम  title=
Want to lose weight before Diwali daily Fenugreek Water in the morning

Fenugreek Water for Weight Loss : बदलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याचा चुकीच्या सवयी, त्यात कामाचा ताण यामुळे अपुरी झोप याचा परिणाम आजचा तरुण पिढीच्या आरोग्यावर सहज दिसून येतोय. सगळ्या मोठी आणि गंभीर समस्या म्हणजे वाढतं वजन. यामुळे अनेक आजारपणाला आपणच आमंत्रण देतो. त्यात आता दिवाळीचा सण येतोय जर तुम्हाली दिवाळी फिट आणि आकर्षित दिसायचं असेल तर आजपासून कामाला लागला. योग्य आहार आणि सोबत थोडा व्यायाम आणि त्याला जोड दिली एका पेयाची तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आयुर्वेदानुसार मेथी ही वजन कमी करण्यापासून साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. (Want to lose weight before Diwali daily Fenugreek Water in the morning)

मेथीच्या दाण्यांमध्ये सोडियम, झिंक, फॉस्फरस, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक आढळतात. याशिवाय मेथीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असतं. यासोबतच यामध्ये प्रथिने, स्टार्च, साखर आणि फॉस्फोरिक ॲसिड देखील असतं. मेथीचे सेवन केल्याने चयापचय गतिमान होते, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. मेथी हा एक असा मसाला आहे जो प्रत्येकाच्या घरातील किचनमध्ये असतोच. आयुर्वेदात मेथीला खूप महत्त्व असून त्याचा सांधेदुखीपासून मुक्त होण्यापासून केस गळण्यापासून बचाव करण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये फायदेशीर ठरतो. 

मेथीचे पाणी कधी पिणे योग्य?

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिणे चांगले मानले जाते. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीऐवजी मेथीचे पाणी प्याल तर तुम्हाला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतील. रोज मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी करता येते. एवढंच नाही तर मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण त्याच्या सेवनाने नियंत्रित ठेवता येतं.

मेथी वजन कमी करण्यासाठी गुणकारी!

वाढत्या वजनाने त्रासलेल्यांपैकी तुम्ही असाल तर मेथीचे पाणी तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतं. यासाठी 1 चमचे मेथीचे दाणे रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी थोडे गरम करून गाळून प्यावे.

मेथी पाण्यात भिजवल्यास त्यातील कडूपणा निघून जातो. तुम्हाला हवे असल्यास मेथीचे दाणेही खाऊ शकता. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर 15 दिवस रोज मेथीचे पाणी प्या. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने होतात 'हे' फायदे

आयुर्वेदानुसार मेथीचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे, त्यामुळे लठ्ठपणा लवकर कमी होतो. मेथीमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. हे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप गुणकारी आहे. त्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय मेथीचे पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)