शरीराला डीटॉक्स करायचंय? मग 'या' आयुर्वेदीक पद्धतींचा करा वापर

आयुर्वेदिक डीटॉ़क्स आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतं

Updated: Aug 6, 2022, 07:04 AM IST
शरीराला डीटॉक्स करायचंय? मग 'या' आयुर्वेदीक पद्धतींचा करा वापर title=

मुंबई : अयोग्य खाण्याच्या सवयी, तणाव, प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान आणि शारीरिक हालचांलीचा अभाव मनावर तसंच शरीरावर वाईट परिणाम करतो. दीर्घकालीन निष्काळजीपणामुळे मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब इत्यादीसारख्या आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवू शकतात. तर आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या मार्गांचा अवलंब देखील करू शकता. 

यासाठी तुम्ही आयुर्वेदिक डीटॉक्स अवलंब करू शकता. आयुर्वेदिक डीटॉ़क्स आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतं. ते अंतर्गतरित्या शरीर स्वच्छ करतात. शरीरास डीटॉक्स करण्यासाठी आपण कोणती आयुर्वेदिक पद्धती अवलंबू शकता जाणून घ्या.

नेती आणि नस्य

नेती आणि नास्या प्राचीन आयुर्वेदिक पद्धती आहेत. हे श्वसन प्रणाली मजबूत करण्यास, सायनसचा त्रास कमी करण्यास  आणि प्राणायाम (श्वास व्यायाम) करण्यास मदत करू शकतात. नेती करण्यासाठी त्यासंबंधीचा पॉट असणं आवश्यक आहे. जो लांब तोटी असलेला लहान चहाच्या भांड्याप्रमाणे दिसतो आणि सामान्यत: तो सिरेमिक बनलेला असतो.

नेतीच्या भांड्याने, आपल्याला नाकाच्या एका बाजूने पाणी घालावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला ते काढावं लागेल. नस्य नाकाची शक्ती वाढवण्यासाठी चांगलं मानलं जातं. यामध्ये नाकात नस्य तेल नाकात टाकलं जातं. नास्या तेल हे तीळ तेल, ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल तेल आणि सेंद्रिय वनस्पती, शंख पुडिंग, ब्राह्मी, नीलगिरी इत्यादी सेंद्रिय औषधींचं मिश्रण असतं.

धौती

धौती कृती सकाळी रिकाम्या पोटी करायची शकते. याचा उपयोग घसा, दात आणि पोट साफ करण्यासाठी केला जातो. टॉक्सिन घटक निघून जाऊन पोट साफ करण्याचं काम करतं. हे एसिडीटी कमी करण्यास, अन्नाची एलर्जी आणि दम्यासारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते. धौती क्रिया केल्याने शरीराचा नैसर्गिक समतोल राखला जातो आणि जास्त पित्त तसंच कफ इत्यादी गोष्टीही दूर होतात.

ऑईल पुलिंग

दातांचं आणि मुखांचं आरोग्य राखण्यासाठी ऑईल पुलिंग ही पद्धत वापरली जाते. दात आणि हिरड्या निरोगी तसंच बळकट ठेवण्यासाठी ‘ऑईल पुलिंग’चा सल्ला देण्यात येत असतो. ही आयुर्वेदिक औषधोपचारांशी संबंधित एक प्राचीन प्रक्रिया आहे. ऑईल पुलिंग दात किडण्याची समस्या कमी करण्यासोबतच हिरड्यांमधून रक्त येणं तसंच तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास फायदेशीर असतं. तसंच तोंडातील वेगवेगळे बॅक्टेरियाही दूर करण्यास याची मदत होते.

कपालभाती

फुफ्फुस आणि किडनीचं आरोग्य सुधारण्यासाठी कपालभारती ही एक आयुर्वेदिक अभ्यास आहे. हे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. नाकातून श्वास घेताना आणि सोडताना शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतो, बद्धकोष्ठता, सायनस, मधुमेह, रक्तातील साखर, हृदयाच्या समस्या, हर्निया यांना बरं करण्यासाठी फायदेशीर असतं.