Vitamin Deficiency : यामुळे दात होतात कमकुवत, अशी घ्यावी काळजी

Vitamin Deficiency : तुम्हाला ही दाताच्या समस्या आहेत. तर तुम्ही आहारात बदल करुन समस्या दूर करु शकतात.

Updated: Nov 10, 2022, 04:54 PM IST
Vitamin Deficiency : यामुळे दात होतात कमकुवत, अशी घ्यावी काळजी title=

Vitamin Deficiency : लोकांमध्ये दातांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. खूपच कमी वयात दातांच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण कोणत्या कारणांमुळे दातांच्या समस्या उद्भवतात हे बऱ्याच लोकांना कळत नाही. असे कोणते जीवनसत्व आहे ज्याच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होतात. जाणून घ्या.

दाताच्या समस्या हे जीवनसत्व ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी याच्या कमतरतेमुळे उद्भवतात  (Vitamin D Deficiency Symptoms). त्यामुळे आहारात बदल करुन तुम्ही ती कमतरता दूर करु शकतात.

जर तुमच्या हिरड्या कमकुवत झाल्या असतील. हिरड्या दुखत असतील किंवा त्यांना सूज आली असेल तर समजा तुमच्यात पोषक तत्वांची कमतरता आहे. त्यामुळे तुम्हाला जीवनसत्व A, व्हिटॅमिन बी 12, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन डी मिळेल असा आहार घ्यावा लागेल.

व्हिटॅमिन सी ( Vitamin C Deficiency )

व्हिटॅमिन सी मुळे केस आणि त्वचा चांगली तर राहतेच पण ते दातांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. दातांमध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखण्याचे काम व्हिटॅमिन सी करते. तुम्ही टोमॅटो, संत्री, ब्रोकोली, सफरचंद आणि मोसंबी खावून व्हिटामिन सी घेऊ शकतात.

व्हिटॅमिन डी (Vitamin D Deficiency )

दातांसाठी व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचे आहे. कारण ते दात निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच कॅल्शियम शोषण्यास मदत करते. त्यामुळे दररोज सकाळी 20 मिनिटे सूर्यप्रकाशात घालवणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन बी (Vitamin B12 Deficiency )

दातांच्या आरोग्यासाठी आणखी एक महत्त्वाचे व्हिटॅमिन म्हणजे बी12. आहारात मांस, मासे, अंडी, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करु शकता. मशरूम व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत देखील मानला जातो.

व्हिटॅमिन ए (Vitamin A Deficiency )

या जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी, दूध, गाजर, पिवळ्या किंवा केशरी भाज्या, पालक, रताळे, पपई, दही, सोयाबीन आणि इतर पालेभाज्या खा.