मॅनफोर्सने लॉन्च केला आद्रक फ्लेवर कंडोम, सोशल मीडियात लोकांनी उडवली मजा

कंडोम बनवणारी कंपनी मॅनफोर्सनेही एक नव्या फ्लेवरचा कंडोम बाजारत आणला आहे. मॅनफोर्सने सोशल मीडियावर याची माहिती देताच नेटीझन्सनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 21, 2018, 04:46 PM IST
मॅनफोर्सने लॉन्च केला आद्रक फ्लेवर कंडोम, सोशल मीडियात लोकांनी उडवली मजा title=

मुंबई : कंडोम हा तसा अनेकांच्या परिचयाचा आणि गरजेचा विषय. त्यामुळे ग्राहकांच्या अवडीननिवडी विचारात घेऊन अनेकदा कंडोम कंपन्याही त्यात बदल करतात. हे बदल अनेकदा फ्लेवरच्या रूपात असतात तर, अनेकदा व्हेरीयंटच्या रूपात. कंडोम बनवणारी अशीच एक कंपनी मॅनफोर्सनेही असाच एक नव्या फ्लेवरचा कंडोम बाजारत आणला आहे. मॅनफोर्सने सोशल मीडियावर याची माहिती देताच नेटीझन्सनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

मॅनफोर्सचा नवा फ्लेवर कोणता?

चॉकलेट, बटर स्कॉच, स्ट्रॅबेरी आदी फ्लेवर्सचे मॅनफोर्सचे कंडोम यापूर्वीच बाजारात आले आहेत. मात्र, सध्या मॅनफोर्सने जो फ्लेवर बाजारत आणला आहे तो काहीसा हटके आहे. कारण, या फ्लेवरचा जास्त संबंध मसाल्यांशी येतो. पण, मॅनफोर्सने तो वेगळ्या रूपात आणला आहे. मॅनफोर्सने आद्रक फ्लेवरचा नवा कंडोम बाजारात आणला आहे.

आद्रक फ्लेवर्सचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर लॉन्च

आपल्या नव्या फ्लेवर्स कंडोमचा फर्स्ट लूकही मॅनफोर्सने सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत पेजवर लॉन्च केला आहे. मॅनफोर्सचा आद्रक फ्लेवर्सचा लूक सोशल मीडियावर येताच नेटीझन्सनी त्यावर मजेशीर अनेक प्रतिक्रीया दिल्या.

लोकांचा अंदाज ठरला फेल

दरम्यान, मॅनफोर्सने यापूर्वी अनेक फ्लेवर्सचे कंडोम बाजारात आणले आहेत. गेल्याच वर्षी मॅनफोर्स आणि ड्यरेक्स यांच्याबाबत एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, तेव्हा ड्यूरेक्स आपली जीन्स बाजारात आणेल असा अंदाज होता. मात्र, सर्वांचा अंदाज फोल ठरवत ड्यूरेक्सने जीन्स नव्हे तर, हटके फ्लेवर्सचा कंडोमच बाजारात आणला.