'या' भाज्या खाताना नाकं मुरडता? खराब कोलेस्ट्रॉल, शुगरला करतात कमी, आहारात आजच सुरू करा

Vegetables For Bad Cholesterol: सध्याच्या जीवनात आपल्याला निरोगी आणि स्वच्छ आहार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सोबतच सध्या खराब कोलेस्ट्रॉलचाही त्रास उद्भवू नये म्हणून आपण आपल्या आहारात या पाच भाज्यांचा समावेश करू शकतो. 

गायत्री हसबनीस | Updated: Dec 7, 2023, 01:17 PM IST
'या' भाज्या खाताना नाकं मुरडता? खराब कोलेस्ट्रॉल, शुगरला करतात कमी, आहारात आजच सुरू करा title=
Vegetables For Bad Cholesterol eat these five fresh veggies for better heart health latest health news in marathi

Vegetables For Bad Cholesterol: 2023 वर्ष हे लवकरच संपणार आहे. नव्या वर्षात आपले नक्कीच नवे प्लॅन्स असतील. त्यात एक गोष्ट आपल्या लिस्टमध्ये नक्कीच असेल आणि ती म्हणजे निरोगी डाएटची. सध्याच्या जीवनात आपल्या सर्वांनाच निरोगी आहार हवा आहे. त्यासाठी आपणही आपल्या परीनं प्रयत्न करताना दिसतो. त्यातून खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचेही आपण अतोनात प्रयत्न करतो. तेव्हा यासाठी आपल्याला पिझ्झा, बर्गर, नूडल्स अशा पदार्थांवर नियत्रंण ठेवणे फारच आवश्यक असते.

आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात निरोगी आणि स्वच्छ आहाराचे अवलंबन करणं हे आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्या आहारात आपण कोणत्या भाज्यांचा समावेश करू शकतो ज्यानं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. 

1. लसूण: आपण इतरांकडून हे नक्की ऐकलं असेल की रोज सकाळी उठून उपाशीपोटी 2 तरी लसणाच्या पाकळ्या खाव्यात ज्यानं तूमचं हृदय हे तंदूरूस्त राहते. हे खरंय सर्दीच्या मौसमातही तुम्ही लसणाचे सेवन करू शकता. यानं शरीर गरम राहते. लसणातील तत्त्वं हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. आपल्या आहारातही लसणाचा वापर करावा. सोबतच लसूण खाल्ल्यानं आपलं ब्लड प्रेशरही नियंत्रित राहते. 

 

2. वांगी: आपल्या आहारात आपण वांगी या फळभाजीचा समावेश करावा. आपल्यासाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर आहे. वांग्याचा समावेश आपल्या दुपारच्या, रात्रीच्या जेवणात करावा. यानं खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. अनेकांना वांगी आवडतही नसतील परंतु नाकं न मुरडता नक्की या भाज्या खाव्यात. 

3. कोबी: आपल्यापैंकी अनेकांना कोबी ही फळभाजी आवडत असेलच. कोबीचे अनेक चमचमीत पदार्थ आपण आवडीनं खातो. कोबीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. कोबी कोलेस्ट्रॉल कमी करतेच परंतु सोबतच ब्लड शुगरही नियंत्रणात ठेवते. 

4. भेंडी: ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी भेंडीची भाजी जरूर खावी. अनेकांना कदाचित ही भाजी आवडत असेल किंवा नसेल. परंतु भेंडीची भाजी खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

5. बीन्स: या भाजीत फायबर, एंटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. बीन्स आपली पाचनक्रिया मजबूत करते. त्यासोबतच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. यानं वजनही कमी होण्यास मदत होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)