पायात दिसतेय निळी नस? अजिबात हलक्यात घेऊ नका; या गंभीर आजाराची सुरुवात

Varicose Veins: व्हेरिकोज व्हेन्स हा आजार जीवघेणा नसला तरी वेळेवर उपचार केले नाहीत तर चालणे-फिरणे कठीण होऊन जाते.

Pravin Dabholkar | Updated: Feb 12, 2024, 06:49 PM IST
पायात दिसतेय निळी नस? अजिबात हलक्यात घेऊ नका; या गंभीर आजाराची सुरुवात title=
Varicose veins

Varicose Veins: आपले शरीर हजारो नसांनी बनलंय. संपूर्ण शरिरात पसरलेल्या रक्तवाहिन्या सर्कुलेटरी सिस्टिमचा एक भाग आहे. ज्या रक्त, ऑक्सिजन आणि न्यूट्रिशियन पूर्ण शरिरात पाठवण्याचे काम करतात. अनेक लोकांच्या पायात निळ्या, हिरव्या आणि वांगी रंगाच्या नसा दिसतात. ही हलक्यात घेण्याची बाब नाहीय. हा 
व्हेरिकोज व्हेन्स नावाचा आजार आहे. नसांच्या भींती कमजोर होतात तेव्हा या ही लक्षणे दिसतात. व्हेरिकोज व्हेन्स जास्त करुन पायांमध्ये आढळते. यामुळे नसांमध्ये स्वेलिंग होते आणि त्या जाड, निळ्या आणि वाकलेल्या दिसतात. 

हा आजार जीवघेणा नसला तरी वेळेवर उपचार केले नाहीत तर चालणे-फिरणे कठीण होऊन जाते. अनेकदा सर्जरी करण्याची वेळ येते. व्हेरिकोज नसांची लक्षणे काय आहेत? ते कसे ठीक करायचे? याबद्दल जाणून घेऊया. 

व्हेरिकोज नसांची लक्षणे?

निळ्या नसा दिसणे, नसांचा गुच्छा दिसणे, पायात सूज येणे, मसल्स दुखणे, स्किनवर अल्सर अशी व्हेरिकोजची लक्षणे आहेत. 

का जडतो हा आजार?

जेव्हा शरिरामध्ये पूर्णपणे रक्त प्रवाह होत नाही तेव्हा व्हेरिकोज व्हेन्सची समस्या वाढचे. रक्त प्रवाह स्लो झाल्याने रक्त नसांमध्ये जमा होऊ लागते आणि नसांमध्ये सूज येऊ लागते. सूज आल्यानंतर नस वाकू लागतात किंवा त्वचेवर दिसू लागतात. व्हेरिकोजमध्ये निळ्या नसांच्या गाठीमुळे अनेकांना त्रास होतो. 

जास्त वेळ उभ्या राहणाऱ्या किंवा खूप वेळ बसून राहणाऱ्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा जास्त त्रास होतो. दुकानदार, शिक्षक, ऑफिसमध्ये तासनतास बसून असणारे कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड्सना यांचा जास्त त्रास दिसून येतो. जे लोक जास्त चालू शकत नाहीत, ते डेंजर झोनमध्ये येतात. 

का जडते समस्या?

हार्मोनचे बॅलेन्स बिघडल्याने, वाढत्या वयामुळे, वजन वाढल्यामुळे, जास्त वेळ उभे राहिल्याने, नसांवर दबाव वाढल्याने ही समस्या जडते. 

काय कराल उपाय?

व्हेरिकोज व्हेन्स ठीक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफ स्टाइलमध्ये बदल करावा लागेल. रोज हिरव्या पालेभाज्या खाल्याने नसा डॅमेज होण्याचा धोका कमी होतो. हिरव्या पानांच्या भाज्यांमुळे नसांमध्ये फॅट आणि कॅल्शियम जमण्यापासून रोखतात. यामुळे सर्कुलेटरी सिस्टिम चांगली कार्य करते. 

यासोबतच वजन नियंत्रणात ठेवा. मिठ आणि साखर कमी खा. घट्ट कपडे घालू नका. यासोबतच एप्पल सायडर विनेगर आणि जैतूनचे तेल आपल्या पायाला लावून त्याने मसाज करा. यामुळे तुम्हाला खूप फरक दिसेल. 

इलाज काय? 

इतके सारे उपाय करुनदेखील व्हेरिकोजवर काही परिणाम होत नसेल तर इलाज करावा लागेल. कपिंग थेरेपी, लीच थेरेपी, मिट्टी लेप सारख्या थेरेपी यावर गुणकारी ठरतात.