Breakup नंतर Move on होण्यासाठी 'या' 5 टिप्सचा करा वापर

आज आपण या बातमीतून Move on कसे करु शकाल हे सांगणार आहोत...

Updated: Oct 8, 2022, 08:15 PM IST
Breakup नंतर Move on होण्यासाठी 'या' 5 टिप्सचा करा वापर title=
Use these 5 tips to move on after a breakup nz

Tips to Move on after Breakup: अनेकदा असे घडते की लोक एकमेकांवर खूप प्रेम करत असल्याचा दावा करतात, परंतु काही दिवस, महिने किंवा वर्ष उलटल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतात. ब्रेकअपची अनेक कारणे असू शकतात जसे रिलेशनशिपमध्ये असताना फसवणूक करणे, एकमेकांकडे दुर्लक्ष करणे, आपले नाते हलक्यात घेणे, एकमेकांना पुरेसा वेळ न देणे किंवा परस्पर समंजसपणा, बाँडिंग (Bonding), अॅटॅचमेंट (Attachment), केमिस्ट्री (Chemistry), कमतरता इ. ही कारणं असू शकतात. (Use these 5 tips to move on after a breakup nz)

अनेक वेळा ब्रेकअपमुळे ती व्यक्ती खूप तुटते, तणावात किंवा डिप्रेशनमध्ये (depression) जाते. ब्रेकअप झाल्यानंतर अशा लोकांना समजते की त्यांचे आयुष्य संपले आहे. हल्लीच्या काळात ब्रेकअप होणे सामान्य आहे पण त्यातून बाहेर पडणे तितकेच कठीण आहे. आज आपण या बातमीतून Move on कसे करु शकाल हे सांगणार आहोत...

आणखी वाचा - पुरुषांना आवडतात 'या' 5 प्रकारच्या महिला...अशा महिलांसोबत आयुष्य...

Breakup नंतर करा Move on

1. ज्या व्यक्तींच्या बाबतीत प्रेमात फसवणूक होते अशा लोकांना आयुष्यात पुढे जाणे खूप अवघड असते. त्या नात्याला लवकर विसरणे हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असते. जुन्या आठवणी, भावना एक-दोन दिवसांत विसरणे सोपे नाही. अर्थात, या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही वेळ काढता, पण इतका वेळ घालवू नका की त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. अशावेळेस तुम्ही रडून तुमचे मन हलके करु शकता. 

2. जर तुमचा बॉयफ्रेंड (Boyfriend) किंवा गर्लफ्रेंडसोबत (Girlfriend) ब्रेकअप झाला असेल तर दिवसभर स्वत:ला बंद खोलीत ठेवू नका. तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवा. त्यांच्याशी बोला. घरामध्ये तुम्ही ज्याच्याशी अगदी जवळचे असाल, त्यांच्याशी तो किस्सा शेअर करा तुम्हाला आराम वाटेल.

3. रात्री उशिरा उठल्यानंतर जुन्या गोष्टींचा विचार करणे थांबवा. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे इतरही अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला झोप येत नसेल तरी झोपण्याचा प्रयत्न करा. 

आणखी वाचा - लग्नानंतर 'या' चुका करु नका नाहीतर पती पत्नीच्या नात्यात येईल दुरावा 

4. ही म्हण तर तुम्ही ऐकली असाल 'जे होतं ते चांगल्यासाठी होतं'. तुम्ही पण हाच विचार करा. ती व्यक्ती तुमच्या प्रेमाच्या लायकीची नाही. जर ती व्यक्ती लग्नाआधी तुम्हाला इतका त्रास देऊ शकते तर लग्नानंतर विचार न केलेला बरा.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)