Boiled Black Gram: दिवसा खाऊन पहा काळे हरभरे... होतील 'हे' फायदे

तर आज आम्ही तुम्हाला काळे हरभरे यातील पोषक घटक आणि उकडलेले हरभरे खाण्याचे फायदे सांगणार आहोत...जाणून घेऊया

Updated: Oct 8, 2022, 06:21 PM IST
Boiled Black Gram: दिवसा खाऊन पहा काळे हरभरे... होतील 'हे' फायदे title=
Boiled Black Gram Try eating black gram during the day you will get benefits nz

Boiled Black Gram Benefits: भारतात अनेकांना काळे हरभरे खाण्याची आवड आहे, सहसा ते पाण्यात भिजवून तेल आणि मसाल्यात शिजवले जातात. काळ्या हरभऱ्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे खाण्याचे अनेक प्रकार आहेत, पण दिवसातून एकदा पाण्यात उकळून खाल्ल्यास ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. तर आज आम्ही तुम्हाला काळे हरभरे यातील पोषक घटक आणि उकडलेले हरभरे खाण्याचे फायदे सांगणार आहोत...जाणून घेऊया (Boiled Black Gram Try eating black gram during the day you will get benefits nz)

काळ्या हरभऱ्यामध्ये पोषक घटक आढळतात

काळ्या हरभऱ्यात पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. यामध्ये प्रोटीनचे (protein) प्रमाण इतर अन्य कडधान्यांपेक्षा खूप जास्त आहे, ते आहारातील फायबरचा (fiber) प्रमुख स्त्रोत देखील आहे, त्यामध्ये इतर कोणते पोषक घटक आढळतात ते जाणून घेऊया.

आणखी वाचा - कमी वयातच मुलं प्रेमात? पालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर... 

 

100 ग्रॅम काळ्या हरभऱ्यामध्ये पोषक घटक आढळतात

ऊर्जा-341 KCL
कर्बोदके - 58.99 ग्रॅम
प्रथिने - 25.21 ग्रॅम
चरबी - 1.64 ग्रॅम
आहारातील फायबर - 18.3 ग्रॅम
फोलेट्स - 216 मिग्रॅ
नियासिन - 1.447 मिग्रॅ
पॅन्टोथेनिक ऍसिड - 0.906 मिग्रॅ
पायरीडॉक्सिन - 0.281 मिग्रॅ
रिबोफ्लेविन-0.254 मिग्रॅ
थायमिन - 0.273 मिग्रॅ

आणखी वाचा - Health Tips : चाळीशीनंतर महिलांनी वजन नियंत्रणात कसे ठेवावे, पाहाच

 

उकडलेले हरभरे खाण्याचे फायदे

1. पचन व्यवस्थित होईल
उकडलेले हरभऱ्यांमध्ये भरपूर फायबर असतात, ज्यामुळे पचन समस्या उद्भवत नाही, ते बद्धकोष्ठता, गॅससह पोटाच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.

2. शरीराला ऊर्जा मिळेल
उकडलेले हरभरे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते हे फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे बहुतेक तज्ञ सकाळी ते खाण्याचा सल्ला देतात, कारण ते दिवसभर शरीराला ऊर्जा देण्याचे काम करू शकतात. 

3. वजन कमी होईल
जर तुम्ही उकडलेले हरभरे दिवसात एकदा खाल्ल्याने तुम्हाला भूक लवकर लागत नाही. तुम्हाला जास्त खाण्याची गरज लागत नाही. तुम्ही हे काळे हरभरे काही दिवस नियमित खाल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)