चीन भारतीयांना खाऊ घालतोय विषारी लसूण! तुमच्या घरात 'चिनी लसूण' तर नाही ना?

Chinese Garlic Risk: चीन हा लसणाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. मात्र चीनमधील या लसणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून थेट अमेरिकेत यामुळे खळबळ माजली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 9, 2023, 09:12 AM IST
चीन भारतीयांना खाऊ घालतोय विषारी लसूण! तुमच्या घरात 'चिनी लसूण' तर नाही ना? title=
चिनी लसणासंदर्भात धक्कादायक खुलासा (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - एपी आणि पीटीआय)

Chinese Garlic Risk: बनावट सामान तयार करण्यासाठी जगभरामध्ये चीनची ख्याती आहे. मात्र अनेकदा या वस्तू घातक असतात. आता तर चीनने चक्क बनावट लसूण तयार करत आहे की काय अशी शंका घेतली जात आहे. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये चीनमधून निर्यात केल्या जाणाऱ्या 'बनावट लसणा'संदर्भात इशारा देण्यात आला आहे. बाजारात विकला जाणारा हा बनावट लसूण भारतामधील कोट्यवधी घरांमध्ये खाल्ला जात असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हा लसूण दिसायला फारच पांढरा आणि ताजातवाना दिसतो. मात्र आरोग्यासाठी हा लसूण धोकादायक ठरु शकतो. नाल्यातील पाण्याचा वापर करुन या लसणाची लागवड केली जाते. लीड आणि अन्य धातू कणांच्या माध्यमातून लसणाची वाढ अधिक मोठी व्हावी यासाठी त्याला अस्वच्छ पाणी दिलं जातं. हा लसूण अधिक पांढरा दिसावा यासाठी चक्क क्लोरीनचा वापर केला जातोय.

अमेरिकेकडून चौकशीची मागमी

अमेरिकेतील एका खासदाराने चीनमधून लसूण आयात करणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे यासंदर्भात सरकारने तपास करावा अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन सीनेट रिक स्कॉट यांनी वाणिज्य सचिवांना लिहिलेल्या पत्रामध्ये आयात केल्या जाणाऱ्या लसणाचं अयोग्य पद्धतीने उत्पादन घेतलं जात असल्याचा संदर्भ देत चिनी लसूण असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. चीन हा लसणाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. अमेरिका हा चीनमधून लसूण आयात करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक उपभोक्ता देश आहे. मात्र लसणाच्या व्यापारावरुन अनेकदा वाद झाले आहेत. आता सीनेट रिक स्कॉट यांनी लसणाच्या वेगवेगळ्या प्रजातींबद्दल सविस्तरपणे माहिती देताना या लसमाच्या दर्जासंदर्भात अमेरिकेने सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

मोठ्या प्रमाणात कर लादला

अमेरिकेने चीनवर उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत लसूण बाजारामध्ये डम्प करण्याचा आरोप केला आहे. 1990 च्या दशकाच्या मध्यापासून अमेरिकेने अमेरिकन उत्पादने बाजारपेठेमधून बाहेर पडू नयेत यासाठी चिनी वस्तूंवर मोठ्याप्रमाणात आयात कर लावला होता. 2019 मध्ये हा कर रद्द करण्यात आला. 

कसा ओळखावा चिनी लसूण?

तुमच्या घरात चीनमधील बनावट लसूण आहे की नाही हे तपासून पाहायचं असेल तर हे फार सोपं आहे. बाजारात विकला जाणारा बनावट लसूण हा अधिक पांढरा असतो. या लसणावर कोणत्याही प्रकारचे डाग नसतात. या लसणाच्या खालील भागावर डाग दिसून आले तर हा लसूण चिनी नाही असं समजावं. जर हा लसूण बुडालाही अगदी पांढरा असेल तर हा नक्कीच विषारी चिनी लसूण आहे असं समजावं.