मुंबई : रोजच्या जेवणामध्ये अनेकजण हिरव्या मिरचीचा समावेश करतात. चटणी असो किंवा अगदी वरणाची फोडणी हिरव्या मिरचीच्या तडक्याशिवाय त्याला चवच येत नाही. मग अशावेळेस आठवड्याभरासाठी हिरव्या मिरच्या विकत घेऊन साठवल्या जातात. मात्र हिरव्या मिरच्या योग्यरित्या साठवून न ठेवल्यास त्या पिकायला लागतात किंवा खराब होतात. मग हे नुकसान टाळण्यासाठी काही खास टीप्स फायदेशीर ठरणार आहेत. हाय मिरची... ओह मिरची... बहुगुणकारी मिरची!
हिरव्या मिरच्या अधिककाळ टिकवायच्या असतील तर त्या झिप लॉक बॅगेमध्ये साठवा. मिरच्या बाहेर ठेवल्या तर त्या सुकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास अति थंड वातावरणामुळे काळ्या पडतात. काही जण मिरच्या प्लॅस्टिक बॅगेत ठेवतात. पण अशाप्रकारे साठवतात त्या झिप लॉक बॅगेमध्ये ठेवा म्हणजे अधिक काळ टिकतील.
मिरचीचा वरचा भाग काढून त्या झिप लॉक बॅगेमध्ये साठवल्यास अधिक दिवस टिकतात. मात्र झिप लॉक करताना त्यामध्ये हवा जाणार नाही याची काळजी घ्या. झिप लॉक केलेली बॅग तुम्ही फ्रीजमध्ये साठवू शकता.
झिप लॉक बॅंगेप्रमाणेच हवाबंद डब्ब्यामध्येही मिरच्या अधिक दिवस टिकतात. डब्ब्यामध्ये एक रूमाल ठेवा. मिरच्या त्यामध्ये झाकून ठेवा म्हणजे मिरच्यांमधील ओलेपणा शोषला जातो.
हिरव्या मिरच्यांना अधिक काळ टिकवायच्या असतील तर अॅल्युमिनियम फॉईलमध्ये त्या कव्हर करून ठेवाव्यात. डबा किंवा प्लेटमध्ये हिरव्या मिरच्या ठेवून त्यावर ऑल्युमिनियम फॉईल लावा. ही प्लेट / डबा 6-7 तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर मिरच्या एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा. हा डबा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यामुळे मिरच्या काही महिने ताज्या ठेवता येऊ शकतात.
मिरचीप्रमाणेच कोथिंबीर अधिक काळ टिकवण्यासाठी सोपा उपाय! नक्की आजमवा.