Almond Overnight Almonds : बुद्धी तल्लख करण्यासाठी आई घरात कायम बदाम खायला द्यायची. तुमच्याही घरात असं होत असेल ना? किंवा तुम्ही पण मुलांना बदाम खायला देत असाल. कारण बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे बदाम अनेक घरात खाले जातात. अगदी अचानक भूक लागते म्हणून आपण एक छोट्या डब्बात ड्रायफूट्स ठेवतो. थोडे ड्रायफूट्स खाल्ले की आपल्याला बरं वाटतं.
काल मी नातेवाईकाकडे गेली असता तिथे बदाम खाण्याची योग्य पद्धत काय यावरुन वाद सुरु होता. सालीसकट बदाम खाले पाहिजे की नाही, यावरुन त्यांच्यामध्ये संभ्रम होता. असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना, मग आज आपण जाणून घेऊयात बदाम खाण्याची योग्य पद्धत कुठली आणि किती बदाम दिवसाला खाले तर चालणार आहेत. (trending news why cover the almonds with water and soak overnight and know the right way to eat almond for more benefit in marathi)
बदामांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटामिन ई, कॅल्शियम, जस्त सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण बदाम सालीसकट खायचं की नाही याबद्दल अनेक लोकांमध्ये दुमत दिसून येतं. बदामाच्या सालीमध्ये टॅनीन नावाचा घटक असतो. टॅनीनमुळे बदामात असणारी उपयुक्त पोषकघटक शरीरात शोषण्यास अडथळा निर्माण होतो. सालीसकट बदाम खाल्ल्यास शरीराला काही फायदा होत नाही.त्याशिवाय बदामाचे साल पचायला खूप जड असतं. त्यामुळे जर तुम्ही सालीसकट बदाम खात असाल तर असं करू नका. कारण बदामापासून होणारे फायदे तुमच्या शरीराला मिळणार नाही.
आता दुसरी गोष्टी बदाम खाण्याची योग्य पद्धत काय. तर बदाम कायम भिजवलेले खावे. बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात आणि त्याची साल काढण्यास सोपं जातं. रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. जर फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास तुमच्या शरीरात कॅल्शियम,झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच, कायम भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.
रात्री 5 बदाम भिजवून ते सकाळी उठून साल काढून खावेत. नियमित प्रकारे असं केल्यास आपल्याला उर्जा मिळते. एका दिवसात 6 ते 8 बदामांपेक्षा जास्त बदाम सेवन करू नयेत, यामुळे वजन वाढू शकते आणि शरीराची उष्णता देखील वाढू शकते.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)