Chicken : दुकानातून चिकन घरी आणल्यावर ते नळाखाली धुणं धोकादायक?

Chicken wash : बाजारातून चिकन आणलं की आपण ते नळाखाली धुतो...पण असं चिकन धुणे धोकादायक असतं असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

Updated: Feb 11, 2023, 03:31 PM IST
Chicken : दुकानातून चिकन घरी आणल्यावर ते नळाखाली धुणं धोकादायक? title=
Trending news It is dangerous to wash the chicken under the tap after bringing it home from the store

Dont Wash Chicken With Tap Water : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. मग अशात बुधवार, शुक्रवार आणि रविवार हा मासांहाराचा दिवस असतो. बाकी दिवशी देवदेवतांचा वार असल्याने त्यादिवशी मासांहार केला जात नाही. रविवार म्हटलं की मस्त चिकन (Chicken), मटन (Mutton) आणि मासांवर (fish) ताव मारण्याचा दिवस...मग रविवारचा बेत (Sunday plan) ठरला का? जर तुम्ही चिकन करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण एका संशोधनात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. चिकनच्या बाबत सरसकट आपण अनेक जण ही चुक करतो. आपण समजतो की चिकन मार्केटमधून घरी आणल्यावर ते लगेचच नळाखाली धुवून घ्या. आम्ही तुम्ही प्रत्येक जण असंच करतं. कारण त्यामुळे चिकन स्वच्छ होतं आणि ते शिवजण्यासाठी तयार होतं अशी साधारण समज असते. पण थांबा आपण इथेच चुकतोय...संशोधनाच्या नुसार नळाखाली चिकन धुणे हे धोकादायक आहे. (Trending news It is dangerous to wash the chicken under the tap after bringing it home from the store )

काय सांगतं संशोधन

शिजवण्यापूर्वी चिकन धुणं धोकादायक ठरू शकतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे चिकन धुऊन घेण्याची सवय ताबडतोब बंद करणं गरजेचं आहे. 'द कॉन्व्हर्सेशन'मधल्या एका अहवालानुसार, शिजवण्यापूर्वी कच्चं चिकन धुऊ नये, अशी शिफारस जगभरातले अन्न सुरक्षितता अधिकारी आणि नियामकांनी केली आहे. चिकन धुतल्याने किचनमध्ये धोकादायक जिवाणू पसरतात. चिकन न धुता पूर्णपणे शिजवणं योग्य असून अशा पद्धतीनं बनवलेलं चिकन खाणं सर्वांत सुरक्षित मानलं जातं. पण ही गोष्ट गृहिणीपासून चिकन प्रेमींनाही माहिती नाही. या संदर्भात केल्या गेलेल्या नवीन संशोधनातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कसा निर्माण होतो धोका? 

 ऑस्ट्रेलियाच्या फूड सेफ्टी इन्फॉर्मेशन कौन्सिलने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं, की ऑस्ट्रेलियातल्या जवळपास निम्म्या घरांमध्ये चिकन शिजवण्यापूर्वी ते धुऊन घेतात. 25 टक्के ग्राहक चिकन अनेकदा आणि नेहमी धुतात, असं डच संशोधनात आढळून आलं. चिकन धुण्याच्या धोक्याबद्दल संशोधन काय सांगतात? अन्नजन्य आजारांची दोन मुख्य कारणं म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर आणि साल्मोनेला हे बॅक्टेरिया अर्थात जिवाणू. हे सामान्यतः कच्च्या चिकनवर आढळतात. कच्चं चिकन धुतलं, तर हे जिवाणू किचनमध्ये सर्वत्र पसरतात आणि त्यामुळे रोगांचा धोका वाढतो.

ऑस्ट्रेलियात गेल्या दोन दशकांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर आणि साल्मोनेलाच्या केसेसचं प्रमाण जवळपास दुप्पट झालं आहे. कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाच्या दर वर्षी अंदाजे 2,20,000 केसेसपैकी 50,000 केसेस थेट किंवा अप्रत्यक्षपणे चिकनमुळे येतात. धुतलेल्या चिकनच्या पृष्ठभागावरून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबावर अलीकडे करण्यात आलेल्या संशोधनातून असं स्पष्ट होतं की हे खूप धोकादायक कृत्य आहे. चिकनवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबातून जिवाणू आसपासच्या गोष्टींवर म्हणजे नळ, भांडी, सुरी आणि कपड्यांवर लागू शकतात. त्यात आपण हाताने चिकन धुतो म्हणजे ते आपल्या शरीरातही जाऊ शकतात. यामुळे विषबाधा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

मग कसं धुवायचं चिकन?

  • तज्ज्ञांच्या मते, चिकन नळाखाली धुण्याऐवजी ते योग्य तापमानावर पूर्णपणे शिजवणं फायद्याचं ठरेल. पण त्याशिवाय चिकन कसं साफ करायचं ते आपण समजून घेऊयात. 
  • चिकनवरील रक्त, अस्वच्छ घटक तुम्ही टिश्यूपेपरनं काढू शकता. 
  • चिकन काय गरम पाण्याने धुवा. त्या पाण्यात मीठ आणि हळद टाका. आता या उकळत्या पाण्यात चिकन जरा वेळ ठेवा आणि नंतर ते धुवा.
  • याशिवाय चिकन गरम पाण्याने धुतल्यावर त्याला मीठ आणि हळद लावून ठेवा यामुळेही विषाणू मरतात. 
  • मांस जर फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर ते हवाबंद डब्यांमध्ये फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला ते शिजवायचं असेल तर साधणार दोन तासापूर्वी फ्रीजरबाहेर काढावे. 
  • चिकन, मटण आणि मासे स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे भांडे, सुरी अगदी सिंकही गरम पाण्याने धुवावे.