लिंबूपाण्याचे अतिसेवन म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा! जाणून घ्या काय होतात परिणाम

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कायम महागात पडतो.

Updated: Aug 15, 2022, 04:08 PM IST
लिंबूपाण्याचे अतिसेवन म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा! जाणून घ्या काय होतात परिणाम title=
trending news health tips excessive lemon water disadvantages side effects in marathi

Lemon Water Disadvantages: कोरोना महासंकटानंतर लोक फार फिटनेस प्रेमी झाले आहेत. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आरोग्य निरोगी ठेवण्याचा कल वाढला आहे. रोजच्या आयुष्यातील घरात सहज उपलब्ध पदार्थातून आपल्या रोगाच्या अनेक छोट्या समस्या दूर होतात. हळद, गूळ आणि लिंबू यासारखे पदार्थांचं सेवन करुन आपण निरोगी राहू शकतो.

आजकाल अनेकांची सकाळ हे कोमट पाण्यात लिंबूचा रस घेऊन होते. यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहते. शिवाय वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबूचा रस हे उत्तम रामबाण उपाय आहे. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कायम महागात पडतो. प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ निलिख वत्स हे सांगतात की, लिंबूपाण्याचं अतिसेवन हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकतं. (trending news health tips excessive lemon water disadvantages side effects in marathi)

आज आपण जाणून घेणार आहोत की, लिंबूपाण्याचं अतिसेवन केल्यास आरोग्याला काय धोका आहे. लिंबूपाण्याचे अतिसेवन केल्यास अवयवांचे नुकसान होऊ शकतं. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे अशात जास्त लिंबूपाणी प्यायल्यामुळे अवयवांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक डॉक्टर लिंबू पाण्याचं सेवन मर्यादित करण्याचा सल्ला देतात. याशिवाय आरोग्याचं काय नुकसान होऊ शकतं हे जाणून घेऊयात. 

1. पोटदुखी 

व्हिटॅमिन सीच्या वाढत्या सेवनामुळे पोटात आम्लपित्त होण्याची शक्यता जास्त असते. अशात लिंबूपाण्याचे जास्त सेवन केल्यामुळे उलट्या, जुलाब होतात. ज्या लोकांना गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांनी कमीत कमी प्रमाणात लिंबूपाण्याचे सेवन करावे. 

2. तोंडात फोड येतात

लिंबूमधील सायट्रिक ऍसिडमुळे ओरल टिश्यूजमध्ये सूज येते. याशिवाय तोंडात फोड येतात आणि जळजळ पण होते. 

3. कमकुवत दात

लिंबू पाण्याचे अतिसेवन केल्यामुळे दात कमकुवत होतात. त्यामुळे लिंबू पाणी बनविताना लिंबाचा स्ट्रॉचा जास्त वापर करा. यामुळे दातांला लिंबाचा रसाचा संपर्क कमी होईल आणि तुमचे दात मजबूत राहतील. 

जे लोक लिंबूमधील व्हिटॅमिन सी शरीरासाठी जास्त आहे म्हणून लिंबूपाण्याचे जास्त सेवन करतात त्यांनी लगेचच असे करणे टाळा. अन्यथा तुम्हाला आरोग्याचा समस्या होऊ शकतात. 

   (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)