When to Change Toothbrush : आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो. अर्थात दात घासतो. मात्र, दिवसातून दोनवेळा दात घासणे आवश्यक आहे. रात्री जेवल्यानंतर ब्रश करणे महत्त्वाचे आहे. आपण जे ब्रश दात घासण्यासाठी वापरतो, त्यालाही एक्सपायरी असते. तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक वस्तूप्रमाणे टूथब्रशचीही स्वतःची एक्सपायरी डेट असते. ही तारीख पूर्ण केल्यानंतर, ब्रश त्वरित बदला पाहिजे.
आपले तोंड आणि दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश महत्त्वाची भूमिका बजावते. दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासणे चांगले मानले जाते. असे केल्याने तोंडातील बॅक्टेरिया तर दूर होतातच पण दातही मजबूत होतात. यासाठी लोक त्यांच्या बजेटनुसार टूथब्रश विकत घेतात आणि सतत वापरत असतात. त्याचे तंतू झिजले तरी लोक ते दात घासत राहतात. टूथब्रश किती दिवसांनी बदलावा हे बहुतेकांना माहिती नसते. आज आपण जाणून घेणार आहोत आणि किती दिवसांनी टूथब्रश बदलावा हे सांगणार आहोत.
आपण दात घासण्यासाठी ब्रशचा वापर करतो. मात्र, दातांच्या डॉक्टरांच्या मते, टूथब्रशचा ब्रँड कोणताही असो, तो 3 महिन्यांनंतर कोणत्याही परिस्थितीत बदलला पाहिजे. याचे कारण असे की तीन महिन्यांनंतर त्याचे तंतू खराब होतात. त्यामुळे ब्रश केल्याने दात स्वच्छ होण्याऐवजी खराब होऊ लागतात.
जर तुम्हाला खोकला, सर्दी, ताप किंवा तोंडातील बुरशीशी संबंधित कोणताही आजार असेल तर तुम्ही ताबडतोब तुमचा टूथब्रश बदलला पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर ते बॅक्टेरिया तुमच्या ब्रशवर चिकटून राहतील, ज्यामुळे तुम्ही बरे होण्याऐवजी आजारी पडत राहाल. कुटुंबातील सर्व सदस्यांनी टूथब्रश एकाच ठिकाणी ठेवू नयेत हेही लक्षात ठेवा. असे केल्याने कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणताही आजार झाला तर तो इतर लोकांमध्येही पसरु शकतो.
प्रत्येक वस्तूप्रमाणे टूथब्रशचीही स्वतःची एक्सपायरी डेट असते. तुमच्या टूथब्रशची एक्स्पायरी डेट संपली आहे की नाही हे तुम्ही दुसऱ्या मार्गानेही तपासू शकता. जर त्याचे तंतू तुटण्यास सुरुवात झाली असेल तर याचा अर्थ असा होतो की ते खराब झाले आहे. म्हणून, अशा परिस्थितीत ब्रश बदलणे शहाणपणाचे आहे. दुसरीकडे, जर ब्रशच्या ब्रिस्टल्सच्या खालच्या भागात पांढरा थर तयार होऊ लागला तर याचा अर्थ असा होतो की, ते बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ब्रश बदलण्यास विलंब होता कामा नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)