मुंबई : अशा अनेक फळभाज्या आहेत ज्या खाल्ल्याने किंवा चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील डाग, तेलकटपणा निघून जातो. अनेक भाज्या अशा आहेत ज्यामुळे चेहरा उजळतो, तेलकटपणा कमी होतो. टॉमेटोही यातलीच बहुउपयोगी आहे.
टॉमेटो चेहऱ्याला लावण्याचे खूप फायदे आहेत. यातील काही आपण जाणून घेऊया..
तुमचा चेहरा निस्तेज असेल तर टॉमेटो यासाठी गुणकारी आहे. टॉमेटोचा ज्युस बनवून त्यात चंदन पावडर, गुलाबपाणी एकत्र करुन पेस्ट तयार करा.
पाच मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून नंतर चेहरा धुवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा करा आणि फरक पाहा.
टॉमेटोमध्ये नैसर्गिक विटामिन्स असतात जे मुरम हटविण्यासाठी मदत करतात. टॉमेटो ज्यूस करुन चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा.
त्यानंतर थंड पाण्याने धुवा. महिन्यातून ६-७ वेळा असे करण्याने मुरुमांमध्ये फरक आलेला जाणवेल.
टॉमेटो धुवून एक मिनिट कोमट पाण्यात ठेवा. त्यानंतर ज्यूस बनवून लिंबाचे ४-५ थेंब टाका. यातून पेस्ट तयार करुन ५ मिनिटं लावा.
हलक्या गरम पाण्याने धुवा. महिन्यातून ६-७ वेळा असं करा. तेलकट चेहऱ्याची समस्या दूर होईल.