पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी खास '५' टिप्स...

प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम असतात. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 26, 2017, 10:23 AM IST
 पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी खास '५' टिप्स... title=

मुंबई : प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम असतात. परंतु, म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन जीवनात करण्याच्या काही गोष्टी....

फायबर्स भरपूर प्रमाणात खा:

फळे, भाज्या यांसारख्या फायबरयुक्त अन्नपदार्थांचा आहारातील समावेश वाढवल्यास पोटातील हेल्दी बॅक्टरीयांचे प्रमाण देखील वाढेल. दिवसभरात तुम्ही सुमारे ३० ग्रॅम फायबर्स घ्यायला हवेत. 

धान्य खा:

आहारात धान्यांचा समावेश केल्याने इम्म्युनिटी, मेटॅबॉलिझम आणि पोटातील चांगल्या बॅक्टरीयांचे प्रमाण सुधारते. 

व्यायाम:

व्यायामामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. व्यायामामुळे घाम येतो आणि अधिक फायबर्स व कार्ब्स खाल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा कायम राहते. परिणामी पोटाचे आरोग्य सुधारते. 

अँटिबायोटिक्स घेणे कमी करा:

अँटिबायोटिक्समुळे पोटातील चांगल्या आणि हानिकारक अशा दोन्ही प्रकारच्या बॅक्टरीयांवर परिणाम होतो. म्हणून अँटिबायोटिक्स टाळणे शक्य नसल्यास त्यासाठी डॉक्टरांना दुसरा सुरक्षित पर्याय विचारा. 

कॉफी घ्या:

कॉफीमध्ये असलेल्या  laxative गुणधर्मांमुळे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. दिवसातून दोन कप कॉफी प्यायल्याने पोटातील Bifidobacterium चे प्रमाण वाढते. त्यामुळे हानिकारक बॅक्टरीयांच्या वाढीला आळा बसतो.