थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या निर्माण होते? डॉक्टरांनी सांगितल्या 5 मोठ्या गोष्टी, दूर होतील गैरसमज

World Thyroid Day 2024 : थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या होतात का? त्याशिवाय बाळाला काही धोका असतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल डॉक्टर अलका गोडबोले यांनी निरासन केलंय. 

नेहा चौधरी | Updated: May 25, 2024, 02:41 PM IST
थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या निर्माण होते? डॉक्टरांनी सांगितल्या 5 मोठ्या गोष्टी, दूर होतील गैरसमज title=
Thyroid Cause Problems During Pregnancy 5 big things doctors say will clear up misconceptions

Thyroid Problems in Pregnancy : थायरॉईड ही आपल्या घशातील एक अशी ग्रंथी आहे, जी अनेक आवश्यक हार्मोन्स आपल्या शरीरात सोडत असते. पण हीच ग्रंथी जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात हार्मोन्स सोड असते तेव्हा त्याला हायपरथायरॉईडीझम असं म्हटलं जातं आणि हीच स्थिती जेव्हा उलटी असते म्हणजे ती कमी प्रमाणात हार्मोन्स सोडते त्याला हायपोथायरॉईडीझमचा त्रास होतो. या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. थायरॉईडची समस्या ही विशेष करुन महिलांमध्ये दिसून येते. थायरॉईडमुळे गर्भधारणेमध्ये समस्या शिवाय गरोदपणात थायरॉईडचा त्रास झाल्यास बाळाच्या जीवाला धोका निर्माण होता का? या आणि अशा अनेक समज गैरसमज महिलांमध्ये दिसून येतात. तुमच्या या प्रश्नांची उत्तर आम्ही World Thyroid Day 2024 निमित्ताने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अलका गोडबोड यांच्याकडून जाणून घेतले आहेत. 

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अलका गोडबोले यांनी सांगितले की, थायरॉईडचा त्रास असलेल्या महिलादेखील मातृत्वच सुख अनुभवू शकतात. हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड अशा दोन्ही स्थितींमध्ये महिलांना गर्भधारणा होऊ शकते. मात्र, यासाठी त्यांना थायरॉईडची काळजी आणि वेळेवेळी औषधं घ्यावी लागतात. थायरॉईडचे व्यवस्थापन करुन महिला या यशस्वी गर्भधारणा करु शकतात.

गर्भधारणेदरम्यान थॉयरॉईड वाढणं धोकादायक?

डॉक्टर गोडबोले यांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान अतिक्रियाशील थायरॉईड म्हणजेच हायपरथायरॉईडीझममुळे माता आणि गर्भातील बाळाला धोका होऊ शकतो. अशा स्थितीत गर्भवतीला उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची दाट शक्यता असते. एवढंच नाही तर मूत्रपिंड आणि यकृताच्या कार्यामध्ये समस्या होतात. अगदी हृदयाचे ठोकेही या स्थिती वाढलेली दिसून येतात. जर थायरॉईडचा अतिरेक झाला तर हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होते. महत्त्वाच म्हणजे वेळेपूर्वी म्हणजे प्रीमॅच्युअर प्रसूती होऊ शकते. अशा बाळांना आनुवंशिक थायरॉईड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

डॉ. गोडबोल म्हणतात की, गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये थायरॉईडची समस्या मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहे. यासाठी आज अनेक उपचार आणि औषध आहेत. पण काही प्रमाणात ही समस्या इतकी गंभीर असते की, महिलांमध्ये अनेक आजार दिसून येतात. हायपोथायरॉईडीझममुळे महिलांना ॲनिमियाचा त्रासदेखील होतो. काही महिलांमध्ये थायरॉईड खूप कमी असतं त्यामुळे त्यांचं वारंवार गर्भपात होतं. या सर्व समस्यांवर योग्य आहार, व्यायाम आणि योग्य औषध उपचार खूप महत्त्वाच आहे. त्यामुळे यासंदर्भात काही टेस्टही असतात त्या करणे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लग्न झाल्यानंतर तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर काही चाचण्या यापूर्वीच करुन घेणे आवश्यक आहे. खरं तर लग्नानंतर महिला आणि पुरुषांनी काही चाचण्या करुन घ्याव्यात. त्यामुळे वेळे आधी समस्या कळल्यास त्यावर मात करणं सोप जातं असं डॉ. अलका गोडबोले सांगतात. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)