ब्रिटन - दररोज आपल्या कानावर अशा अनेक बातम्या येतात ज्यामध्ये अनपेक्षित माणसाला कॅन्सर झाल्याचं आपण ऐकतो. जगभरात कॅन्सरने लाखो नागरिकांचा जीव जातो. आपली अयोग्य लाईफस्टाईल किंवा धुम्रपान याने कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. मात्र एक असंही पेय आहे ज्याच्या सेवनाने कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. आणि रिसर्चमध्ये हे सिद्धही झालंय.
कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्यावर पर्मनंट उपाय अजूनही सापडलेला नाही. म्हणूनच जगभरात अनेकांचा जीव कॅन्सरमुळे गेल्याचं आपण पाहिलंय. या भयंकर आजाराने शरीरातील पेशींवर परिणाम होतो आणि हळूहळू आपल्या शरीरातील अवयव काम करणं बंद करतात. वेळेत याबाबत माहिती मिळाली तर यावर इलाज केला जाऊ शकतो. World Cancer Research च्या माहितीप्रमाणे असे काही पेय आहेत ज्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यात वाढते. जर तुम्ही या गोष्टीचं सेवन बंद केलं तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता कमी होत जाते.
तळलेले पदार्थ, जास्त शिजलेलं अन्न, जास्त साखरयुक्त आणि कार्बोहायड्रेटयुक्त प्रोसेस्ड मांस, याशिवाय एक गोष्ट अशी आहे ज्याच्या सेवनामुळे तुम्हाला कॅन्सर चा धोका वाढतो. आपली चुकीची लाईफस्टाईल केन्सरच्या पेशींना शरीरात वाढीस चालना देतात. मात्र हे एक असं ड्रिंक आहे ज्याच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढतो.
Express.co.uk ज्या च्या माहितीनुसार कॅन्सरच्या पेशींना वाढवणारं पेय आहे मद्य. कॅन्सर रिसर्च UK च्या माहितीनुसार मद्याच्या अधिक प्रमाणातील सेवनाने कॅन्सरचा धोका बळावतो.
भारतातील मद्याबाबतची महत्त्वाची आकडेवारी जाणून घेऊयात. भारतात मद्याच्या विक्रीची महत्त्वाची आकडेवारी स्टेटिस्टा रिसर्च डिपार्टमेंटने 2022 मध्ये प्रकाशित केलीये.
Centers for Disease Control and Prevention म्हणजेच सीडीसी च्या माहितीनुसार रेड वाईन, व्हाईट वाईन, आणि मद्यासोबत सर्व प्रकारच्या अल्कोहोलिक पेयांच्या सेवनाने कॅन्सरचा धोका बळावतो. जो जास्त मद्याचं सेवन करतो त्याला कॅन्सरचा जास्त जास्त. Express.co.uk च्या माहितीनुसार रिसर्चर्स गेली अनेक वर्ष याबाबत माहिती हॉल करत होते. आता ते निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.
ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ, पेकिंग युनिव्हर्सिटी आणि बिजींगच्या चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स या संस्थांनी केलेला रिसर्च इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित कारण्यात आलाय. या रिसरच्या निष्कर्षातून मद्याच्या सेवनाने कॅन्सरचा धोका बळावतो हे स्पष्ट होतं
( विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)