सावधान! प्रसूतीनंतर महिलांना होऊ शकतो या गोष्टीचा त्रास

चुकीच्या जीवनशैलीमुळे तसंच अयोग्य खाण्याच्या सवयीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Updated: Jun 13, 2021, 06:34 PM IST
सावधान! प्रसूतीनंतर महिलांना होऊ शकतो या गोष्टीचा त्रास title=

मुंबई : चुकीच्या जीवनशैलीमुळे तसंच अयोग्य खाण्याच्या सवयीमुळे मूळव्याधाची समस्या उद्भवू शकते. तर प्रसूतीनंतर देखील अनेक महिलांना मूळव्याधाचा त्रास होतो. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना या त्रासाला सामोरं जावं लागतं. मूळव्याधामध्ये गुदद्वाराच्या आतील आणि बाहेरील रक्तवाहिन्यांना सूज येते. गर्भधारणेदरम्यान उद्भवलेला मूळव्याधाचा त्रास प्रसूतीनंतर बरा होतो. मात्र कधीकधी ही समस्या मुलाच्या जन्मानंतरही जाणवते.

गर्भधारणेनंतर मूळव्याधाची कारणं

- गर्भधारणेदरम्यान प्रोजेस्टेरॉन हार्मोनमध्ये वाढ होते. यामुळे नसा रिलॅक्स होऊन त्यांना सहज सूज येऊ शकते.

- प्रोजेस्टेरॉन गर्भवती महिलांमध्ये बद्धकोष्ठता निर्माण करू शकतो. यामुळे आतड्यांचं कार्य हळूवार होऊ शकतं.

- प्रसुतिदरम्यान जास्त दबाव आणल्यामुळे मूळव्याधाचा त्रास होतो.

प्रसूतीपूर्व मूळव्याधाची लक्षणं

- मूळव्याधाचा त्रास होण्यापूर्वी गुदद्वारासंबंधी वेदना तसंच जळजळ जाणवू शकते. त्याचप्रमाणे शौचालयाच्या वेळीही व्यक्तीला वेदना जाणवतात.

- प्रत्येकदिवशी हा त्रास वाढत जातो. एका ठिकाणी बसल्यावर रूग्णाला वेदना होतात.

- शौचानंतरही फ्रेश न वाटणे

बहुतेक प्रकरणांमध्ये, प्रसूतीपूर्व मूळव्याधाच्या समस्येचं काही दिवसानंतर आपोआप निराकरण होतं. तर घरगुती उपचारांच्या आणि आहारातील बदलांच्या मदतीने या त्रासापासून मुक्तता मिळू शकते. यावर उपचार करताना डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.