मुंबई : जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये, हे बऱ्याचजणांना ठाऊक आहे. पण पाणी पिण्याव्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत त्या जेवल्यानंतर लगेच करणे योग्य नाही. म्हणून जेवणानंतर या गोष्टी करणे टाळा.
जेवणानंतर लगेच स्मोक करणे हे १० सिगरेट ओढण्यासारखे आहे. तसंच शात्रज्ञांच्या मते जेवल्यानंतर स्मोक केल्याने फुफ्फुसं आणि bowel कॅन्सरचा धोका वाढतो. the American Journal of Clinical Nutrition च्या अभ्यासानुसार जेवल्यानंतर स्मोक केल्याने मेटॅबॉलिझम मंदावते.
रात्रीच्या जेवणानंतर लगेच चहा घेतल्यास शरीरात लोह (आयन) शोषून घेण्यास अडथळा निर्माण होतो. तसंच शारीरिक क्रियांसाठी आवश्यक असलेले catechins कंपाऊंडचे शरीरातील प्रमाण कमी कमी होते.
जेवल्यानंतर फळे खाल्याने अपचन, छातीत जळजळ, ढेकर येणे अशा समस्या उद्भवतात, असे डॉ. निनाद काकडे म्हणाले. तसंच जेवणानंतर काहीही खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढीचा धोका वाढतो. आणि फळात भाज्यांपेक्षा तीनपट अधिक कॅलरीज असतात.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने ब्लॉटिंग होण्याची शक्यता असते. तसंच काहीशी अस्वस्थता जाणवते. न्यूट्रीशियनिस्ट दीपशिखा अग्रवाल यांच्या सल्ल्यानुसार जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्नपचनाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो व acid reflux होतं.
the journal Review Norwegian च्या अहवालानुसार जेवणानंतर अन्न पचनासाठी रक्तप्रवाह पोटाच्या दिशेने होत असतो. अंघोळ केल्याने रक्तप्रवाह हातापायांच्या दिशेने होऊ लागतो. त्यामुळे पचन क्रियेवर परिणाम होतो.