मुंबई : भारतीय लोक हे चहाप्रेमी आहेत आणि त्यांचा चहा म्हणजे फक्त 'टी' नसून ते अनेक हर्ब्स, मसाले आणि चहाचे मिश्रण असते. बऱ्याचजणांसाठी चहा ही एक थेरपी आहे. त्यामुळे झटकन मूड बदलतो. चहाचा एक घोट घेताच चहाप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. हाच आनंद वाढवण्यासाठी आणि चहा अधिक हेल्दी बनवण्यासाठी त्यात हे जिन्नस घाला.
यात अँटिऑक्सिडेन्ट भरपूर प्रमाणात असतात. यात असलेल्या अँटीबॅक्टरील गुणधर्मांमुळे शरीरातील किटाणूंशी सामना करण्यास मदत होते.
हा मसाल्याचा पदार्थ म्हणजे एक प्रकारचे औषध आहे. यात अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटी इन्फ्लामेट्री गुणधर्म असतात. तसंच मधुमेह, कॅन्सरशी सामना करण्यास याचा फायदा होतो. त्याचबरोबर cardiovascular diseases आणि neurological disordersशी सामना करण्यास याची मदत होते.
अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटीमायक्रोबीयल (antimicrobia) गुणधर्मांनी युक्त असा हा मसाल्याचा पदार्थ ट्युमरच्या वाढीला नियंत्रित करतो. मेंदूला नवे तेज प्राप्त होऊन तो सतेज होतो. तसंच त्यात अँटीडिप्रेसंट (anti-depressant) गुणधर्म असतात.
सर्दी-खोकल्यावर आलं गुणकारी असल्याचे आपण जाणतोच. पण त्याचबरोबर मळमळ, मायग्रेन, हायपरटेन्शन आणि arthritis वर देखील आलं फायदेशीर आहे.
मसाल्याच्या पदार्थांमध्ये हळद अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते. तसेच गॅस निघून जाण्यास, पचन सुधारण्यास, मासिक पाळी नियमित करण्यास आणि पित्ताशयातील खडे विरघळून जाण्यास मदत होते. arthritis वर आराम मिळण्यासाठी हळद अत्यंत फायदेशीर आहे.
गवती चहामुळे पटकन मूड चांगला होतो आणि ताणमुक्त होण्यास मदत होते. त्यात अँटी इन्फ्लामेट्री आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. दातदुखी, पोटदुखी आणि पोटाच्या इन्फेकशनवर गवती चहा उपयुक्त आहे.
तुळस औषधी असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ब्लड ग्लुकोज, ब्लड प्रेशर आणि लिपिड लेव्हल आटोक्यात ठेवण्यास याची मदत होते. तसंच तुळशीमध्ये अँटी डिप्रेसंट गुणधर्म असल्यामुळे ताण निघून जाण्यास आणि स्मरणशक्ती वाढण्यास अतिशय उत्तम आहे.