शरीरातील रक्तवाहिन्या साफ ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'हे' सुपरफुड्स

मुळात हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये प्लॅमा होऊन आतील बाजूने धमनी अरूंद होते. परिणामी रक्त योग्यरित्या प्रवाहित होण्यास अडथळा येतो आणि हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.

Updated: Jan 14, 2023, 09:34 PM IST
शरीरातील रक्तवाहिन्या साफ ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'हे' सुपरफुड्स title=

Artery cleansing foods : हार्ट अटॅक हा जगातील सर्वात मोठा जीवघेणा आजार मानला जातो. Centers for Disease Control and Prevention च्या माहितीनुसार, चार जणांपैकी एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण हे हार्ट अटॅक असतं. मुळात हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये प्लॅमा होऊन आतील बाजूने धमनी अरूंद होते. परिणामी रक्त योग्यरित्या प्रवाहित होण्यास अडथळा येतो आणि हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.

मात्र धमन्या सुरक्षित राहण्यासाठी काही खाद्यपदार्थ फायदेशीर ठरतात. असेच काही पदार्थ आहेत जे तुमच्या धमन्यांना आतील बाजूने निरोगी ठेवून हृदयाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

अळशी

अळशीचे मानवी शरीराला अनेक फायदे होतात. धमन्यांसाठी हे एक चांगलं सूपरफूड मानलं जातं. अळशीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते त्याचसोबत ब्लड प्रेशर योग्य राहतं. यामुळे धमन्यांमध्ये रक्तांच्या गुठळ्या होत नाहीत. 

डाळिंब

डाळिंबामध्यये phytochemicals चं प्रमाण असतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट असंत जे रक्तवाहिन्याच्या अस्तरांचं नुकसान होऊ देत नाही. डाळिंबाचा रस शरीरातील nitric oxide उत्तेजित करतं ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम असतं. ज्या धमन्यांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. त्याचप्रमाणे यामध्ये असलेल्या फायबरमुळे कोल्स्ट्रॉलची पातळी चांगली राहण्यास मदत होते.

हळद

भारतीय मसाल्यामध्ये हळद ही आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी मानली जाते. हळदीचा आहारात समावेश केल्याने धमन्यांचं नुकसान होत नाही आणि रक्ताच्या गुठळ्याही होत नाहीत.

दालचिनी

भारतीय मसाल्यातील अजून एक पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो तो म्हणजे दालचिनी. दालचिनीमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं आणि धमन्यांच्या आत चरबी जमा होऊ देत नाही. परिणामी हार्ट अटॅकचा धोका टळतो.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी ही लक्षणं येतात दिसून

हातांना मुंग्या येणे- हाताला मुंग्या येणे किंवा काही भाग बधीर होणे, हे देखील हृदयविकाराची लक्षणं आहेत. कधीकधी जास्त वेळ चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे सुद्धा हाताला मुंग्या येतात. संशोधनानुसार, एका किंवा दोन्ही हातांमध्ये अचानक बधीरपणा येणे, हे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचे लक्षण असू शकते. 

इतर लक्षणे- छातीत दुखणे, अस्वस्थता यांचा इतर लक्षणांमध्ये समावेश आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी हलकी डोकेदुखी किंवा धाप लागू शकते. वारंवार खोकला येणे किंवा पॅनीक अटॅकसारखे वाटतं.