Sexual Health: सेक्स लाईफ बिघडवतात आरोग्याच्या 'या' समस्या

आरोग्याच्या अशा काही समस्या आहेत ज्यामुळे तुमच्‍या लैंगिक जीवनावर त्यांचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

Updated: Feb 4, 2022, 03:08 PM IST
Sexual Health: सेक्स लाईफ बिघडवतात आरोग्याच्या 'या' समस्या title=

मुंबई : जोडीदाराशी सेक्शुअली कनेक्ट असणं हे नातेसंबंधातील घनिष्ठतेचं चांगल लक्षण आहे. हे तुमचं सेक्शुअल हार्मोन्स आणि शरीरही निरोगी ठेवण्यास मदत करतं. आरोग्याच्या वाढत्या समस्यांमुळे तुमचं सेक्शुएल लाईफ खराब होऊ शकतं. मात्र आरोग्याच्या काही समस्या आहेत ज्यामुळे तुमच्‍या लैंगिक जीवनावर त्यांचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

मधुमेह

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या पुरुषांना इरेक्शनच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. हाय ब्लड शुगर आपल्या रक्तवाहिन्या आणि नसांवर वाईट परिणाम होतो. यासह, सेक्स ऑर्गन्ससाठी आवश्यक असलेल्या सामान्य रक्त प्रवाहावर देखील याचा परिणाम होतो. या स्थितीत महिलांना योनीमार्गात कोरडेपणा, वेदनादायक इंटरकोर्स आणि लैंगिक इच्छा नसणं जाणवतं. निरोगी आणि स्वच्छ डाएटसोबत शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं हा या समस्येवरचा उपाय आहे.

क्रॉनिक पेन

शरीराच्या कोणत्याही भागात क्रॉनिक पेन होणं म्हणजेच तीव्र वेदना होणं हे तुमच्या सेक्शुअल डिसायरला कमी करतं. क्रॉनिक पेनपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. 

हृदयाचे आजार

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीला काही काळापूर्वी हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्याने काही काळ सेक्सबाबत सावध राहिलं पाहिजे.

आर्थरायटिस

सांधेदुखी किंवा क्रॅम्प्स तुमचं सेक्स लाईफ मोठ्यात प्रमाणात खराब करू शकतात. लैंगिक संबंधासाठी शरीराची हालचाल आवश्यक असल्याने, या आर्थरायटिसने ग्रस्त लोक लैंगिक संबंध टाळतात.