Belly fat कमी करण्यासाठी हे ड्रिंक्स ठरतील फायदेशीर

व्यायामासोबतच तुम्ही तुमच्या आहारात काही सोपे बदल केले तरी तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. 

Updated: Jun 3, 2022, 07:14 AM IST
Belly fat कमी करण्यासाठी हे ड्रिंक्स ठरतील फायदेशीर title=

मुंबई : चुकीच्या सवयींमुळे आणि अयोग्य आहारामुळे वाढलेल्या वजनाचा आजकाल अनेकांना सामना करावा लागतोय. वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम करून प्रचंड मेहनत घेतात. परंतु व्यायामासोबतच तुम्ही तुमच्या आहारात काही सोपे बदल केले तरी तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. 

रोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. लिंबूमध्ये व्हिटॅमिनस सी, व्हिटॅमिन बी-6, सायट्रिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम हे घटक असतात. या घटकांचा शरीराला फायदा होतो. लिंबूमध्ये वजन कमी करण्यासाठी मदत करणारे अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म देखील आढळतात. त्यामुळे लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं

आलं आणि लिंबूचे पाणी 

आलं आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते. आलं आणि लिंबूचे पाणी प्यायल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबू आणि आल्याचा रस घाला. या मिश्रणात थोडं काळं मीठ मिक्स करा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्या. यामुळे तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. 

लिंबू आणि पुदिन्याचे पाणी

लिंबू आणि पुदिन्याचं पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. हे पेय बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात पुदिन्याच्या पानांचा आणि लिंबाचा रस मिक्स करा. या मिश्रणात काळं मीठ घाला. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिऊन वजन कमी करू शकता. 

मध आणि लिंबू पाणी 

लिंबू आणि मधाचं पाणी देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबूचा रस आणि एक चमचा मध घाला. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

(टीप : बातमीमध्ये दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ज्ञांचं मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)