दारूसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ... नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम

परंतु दारूसोबत जर का तुम्ही हे पदार्थ खात असाल तर

Updated: Oct 1, 2022, 06:55 PM IST
दारूसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ... नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम  title=

 

Foods to Avoid While Consuming Alcohol: दारूचं सेवन करताना अनेकांना काहीतरी खाण्याची सवय असते. दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असते असे असून देखील अनेक जण त्याचं सेवन करतात. दारूच्या सेवनानं गंभीर आजार होऊ शकतो. 

परंतु दारूसोबत जर का तुम्ही हे पदार्थ खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

खालील दिलेल्या पदार्थांना दारू पिताना अजिबात खाऊ नका, त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तेव्हा जाणून घ्या कोणकोणत्या पदार्थांपासून तुम्हाला दूर राहायचे आहे. 

आंबट फळं - 
दारू पिताना संत्री सारखी आंबट फळं खाऊ नयेत. या फळांमध्ये ऍसिडचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पचनसंस्थेत अडचणी निर्माण होऊ शकतात.

स्पाईसी फूड्स - 
दारू सोबत स्पाइसी फूड कधीही खाऊ नयेत. मसालेदार पदार्थांमध्ये कॅप्साइसिन असते. त्यामुळे हृदयात हीट वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

फ्राईज - 
फ्राईजमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. वाइन किंवा बिअरसोबत हे फ्राईज पचवणे खूप कठीण असतं. दोघांचे सेवन एकत्र केल्यास पोट खराब होऊ शकते. यामध्ये असलेल्या सोडियममुळे तुमच्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. 

चॉकलेट्स -
चॉकलेटमध्ये फॅट, कोको आणि कॅफिनचे प्रमाण अधिक असते. बियरसोबत चॉकलेट खाल्ल्याने तुम्हाला अधिक नशा चढू शकते. 

बर्गर्स - 
दारू पिताना सोबत कधीही बर्गर खाऊ नये. या गोष्टी पचवायला फार त्रासदायक असतात. लिवरला त्याचा परिणाम होऊ शकतो. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)