स्तनांमधील 'हे' 5 संकेत सांगतात कॅन्सरची झालीय लागण, घाबरु नका लगेच करा हे उपाय

Breast Cancer Eearlier Symptoms : महिलांना मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सरची लागण होते. यामुळे आपल्या शरीराची आणि खास करुन स्तनांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 29, 2024, 11:25 AM IST
स्तनांमधील 'हे' 5 संकेत सांगतात कॅन्सरची झालीय लागण, घाबरु नका लगेच करा हे उपाय title=

अनेकदा अतिशय सामान्य वाढणारी गाठ ही जीवघेण्या कॅन्सरच्या गाठीवर जाते. त्यामुळे आपली शारीरिक काळजी घेणे आवश्यक असते. अशातच महिलांना स्तनांची काळजी घेण्याचा विशेष सल्ला दिला जातो. कारण स्तन हे कायमच महिलांकडून दुर्लक्षित राहणार अवयव आहे. अशावेळी महिलांनी आपल्या स्तनांचा आकार आणि आजूबाजूच्या जागी जर काही बदल होत असतील तर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आज आपण ब्रेस्ट कॅन्सरची अतिशय सुरुवातीची लक्षणे जाणून घेणार आहोत. यामुळे जर महिलेला या कॅन्सरची लागण झाली तर त्याच्यावर उपचार करणे शक्य होईल. 

निपलमध्ये बदल 

ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये निपलची स्थिती परिवर्तीत होते. जर तुमच्या निपलमध्ये कोणता बदल जाणवला तर आपल्या डॉक्टरांशी पहिला संपर्क साधा. 

ब्रेस्टमधून पाणी येणे 

ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये महिलांच्या निप्पलमधून पाण्यासारखा पदार्थ बाहेर येतो. अशाप्रकारची लक्षणे गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये जाणवतात. पण अशी परिस्थिती नसताना जर निप्पलमधून पाणी येत असेल तर एकदा तज्ज्ञांशी संपर्क साधा. 

स्तनांचा आकार बदलतो 

ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पेशी अनियंत्रित विकसित होतात. ज्यामुळे स्तनांच्या आकारातील बदल सगळ्यात आधी दिसेल. जर तुम्हाला स्तनांच्या आकारात बदल दिसल्यास हेल्थ एक्सपर्टशी संपर्क साधा. यामुळे महिलांना दिवसातून एकदा तरी स्तनांना हात लावून त्यामधील बदल अनुभवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 

स्तनांवर गाठ दिसणे 

ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांमध्ये स्तनांवर गाठ असणे हे देखील एक आहे. स्तनाच्या शेजारी जर नवीन गाठ येत असेल किंवा जाडपणा आला असेल तर महिलांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असतेच असं नाही पण काळजी घेणे आवश्यक आहे. 

त्वचेत बदल 

ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनाच्या शेजारील त्वचेमध्ये देखील बदल झालेला पाहायला मिळते. यामध्ये त्वचा सुकणे, त्वचेवर दाणे येणे, त्वचेवर गाठ येणे यासारख्या बदलांकडे विशेष लक्ष द्या. कारण हे बदल ओरडून सांगतात की, स्तनांचा कॅन्सर झालाय. 

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)