सावधान! झोपेसंबंधीच्या 'या' समस्येने 40 लाख भारतीय त्रस्त

भारतातील लोक झोपेशी संबंधित एका समस्येला बळी पडत आहेत.

Updated: Sep 24, 2021, 08:17 AM IST
सावधान! झोपेसंबंधीच्या 'या' समस्येने 40 लाख भारतीय त्रस्त title=

मुंबई : भारतातील लोक झोपेशी संबंधित एका समस्येला बळी पडत आहेत. 'डेंटल स्लीप मेडिसिन' वरील परिषदेनुसार, भारतातील सुमारे 4 दशलक्ष लोक, विशेषत: वृद्ध आणि लठ्ठ लोक, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (ओएसए) सिंड्रोमने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, जर एखादी व्यक्ती श्वासोच्छोवासामुळे रात्री अनेक वेळा उठली आणि दिवसभर डोकेदुखी किंवा थकवा असेल तर ते ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियामुळे होऊ शकते.

रेस्पिरेटरी थेरपीमध्ये, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियावर सहसा सतत सकारात्मक वायुमार्ग दाब यंत्रांद्वारे उपचार केले जातो. 

सरस्वती दंत महाविद्यालयाचे डीन आणि परिषदेचे आयोजक प्राध्यापक अरविंद त्रिपाठी म्हणाले, “लठ्ठपणा, जीवनशैलीचा ताण आणि दात पूर्णपणे गमावल्याने वरच्या वायुमार्गामध्ये कॉम्प्रेशन होऊ शकतं. त्याचा श्वसनावर विपरित परिणाम होतो. जर अशी स्थिती बराच काळ टिकून राहिली आणि उपचार न केल्यास ती शरीराला ऑक्सिजनची गरज प्रभावित करते आणि हृदय आणि श्वसन समस्या निर्माण करू शकते.”

दंतचिकित्सा मध्ये, तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की, या स्थितीचा उपचार मॅन्डिब्युलर अॅडव्हान्समेंट डिव्हाइसद्वारे केला जाऊ शकतो. एक एक मौखिक उपकरण आहे जे तात्पुरतं जबडा आणि जीभ पुढे हलवते, घशातील घट्टपणा कमी करते आणि वायुमार्गाची जागा वाढवते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या लखनऊ कार्यालयाचे डॉ अंकुर म्हणाले, "सुमारे 80 टक्के रुग्णांना माहित नाही की ते ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियाने ग्रस्त आहेत आणि ते जीवघेणं असू शकतं, त्यामुळे लोकांना याबद्दल मूलभूत ज्ञान असलं पाहिजे."