इंग्लंड : कॅन्सर एक जीवघेणा आजार आहे. मात्र वयाच्या एका विशिष्ठ काळानंतर हा आजार व्यक्तीला जडतो. मात्र इंग्लंडच्या प्लायमाऊथमधील 12 वर्षांच्या मुलीला असं काहीसं घडलंय की सर्वजण हैराण झाले आहेत.
12 वर्षीय सिनैड जैलिक या मुलीला सतत पोटदुखीची तक्रार जाणवत होती. एके दिवशी सिनैडला तीव्र पोटदुखी सुरु झाली आणि सूज आल्याचं देखील जाणवलं. यानंतर तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तपासणी दरम्यान सिनैडसा गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचं समोर आलं.
सिनैडची आई जोडी म्हणाली, 'ख्रिसमसच्या दिवशी सिनैडची पहिली केमोथेरपी झाली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान, तिचे संपूर्ण केस गळून पडले आहेत आणि आता तिने विग घातला आहे. केमोथेरपी आता पूर्ण झाली आहे."
"वर्षाच्या सुरुवातीला तिला कोरोनामुळे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्हाला आयसोलेट व्हावं लागलंय. सिनैडच्या गर्भाशयात चार कर्करोगाच्या गाठी शिल्लक आहेत आणि त्या काढता येत नाहीत. जरी, डॉक्टर म्हणतात की या कर्करोगाच्या पेशी मृत आहेत. परंतु नोव्हेंबरमध्ये करायाच्या स्कॅनमधून आम्हाला त्याबद्दल योग्य माहिती कळेल," असंही जोडी यांनी सांगितलंय.
सिनैडची आई म्हणाली, "परिस्थिती सुधारल्यानंतरच तिला शाळेत जायचं होतं. ती तिच्या मैत्रिणींना खूप मिस करायची. थकलेलं असूनही बरं वाटत नसलं तरी ती आठवड्यातून तीन दिवस शाळेत जाते. मात्र तिचा शाळेतील अनुभव चांगला नव्हता. वर्गातील मुलं तिच्या विगबद्दल खिल्ली उडवायची. त्यानंतर ती शाळेत न जाण्याचं निमित्त शोधायची. मी त्याबद्दल तक्रार करण्यासाठी शाळेतही गेले, पण जेव्हा मी घरी परतले, तेव्हा मला सिनैडकडे पाहून आश्चर्य वाटलं. माझी लहान मुलगी विग न घालता गणवेश घालून शाळेत जाण्यास तयार होती."
जोडी यांच्या सांगण्यानुसार, 'सिनैडचे धाडस पाहून मला स्वतःचा खूप अभिमान वाटला. पण मला अजूनही भीती वाटत होती की, तिच्या वर्गातील मुलं पुन्हा त्रास देतील. माझी मुलगी म्हणते की, ती आता कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही."