प्रवासादरम्यान येणाऱ्या उल्टीवर रामबाण उपाय

कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Updated: Aug 27, 2019, 06:03 PM IST
प्रवासादरम्यान येणाऱ्या उल्टीवर रामबाण उपाय  title=

मुंबई : कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात. या कारणांमुळे चक्‍कर येते किंवा मळमळ होते. 

लवंग : लवंगचे तसे अनेक फायदे आहेत. पण यामुळे मळमळदेखील होत नाही. प्रवासादरम्यान एक लवंग चघळत राहिल्याने मळमळ होत नाही.

लिंबू : लिंबूमध्ये असेलेले सिट्रिक अॅसिड उल्टी आणि मळमळ होण्याची समस्या दूर करते. यासाठी एक कप गरम पाण्यात एक लिंबूचा रस आणि मीट टाकून प्यायलं पाहिजे. लिंबू पाण्यात मध टाकून देखील तुम्ही ती घेऊ शकता.

अद्रक - प्रवास करण्‍यापूर्वी एक कप अद्रकचा चहा पिल्‍याने होणारी उल्‍टी होत नाही. एक कप अद्रक चहामुळे मळमळही थांबते.

पुदिना - पुदिन्‍यामुळे मोशन सिकनेसच्‍या समस्‍येपासून ताबडतोब आराम मिळतो. पुदिन्‍यातील मेथॉंलमुळे पोटातील मांसपेशी शांत होतात व मळमळ कमी होते. तसेच मोशन सिकनेसच्‍या समस्‍येला दूर करण्‍यासही पुदिना मदत करतो.