मास्क न घालणाऱ्यांवर आता होणार कठोर कारवाई; कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता मोठा निर्णय

नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Updated: Aug 18, 2022, 06:19 AM IST
मास्क न घालणाऱ्यांवर आता होणार कठोर कारवाई; कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता मोठा निर्णय title=

मुंबई : डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन म्हणजेच DGCA ने विमान कंपन्यांना मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितलंय. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं वाढत असताना या सूचना देण्यात आल्या आहेत. एव्हिएशन रेग्युलेटर DGCA ने विमान कंपन्यांना मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यास सांगितलंय.

यासंदर्भात विमानतळ आणि विमान कंपन्यांमध्ये अचानक तपासणी करण्यात येणार असून नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कोविड प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता विमान वाहतूक नियामक DGCA ने जारी केलेल्या विमानांमध्ये प्रवाशांनी मास्क घालावेत याची खात्री करण्यास विमान कंपन्यांना सांगण्यात आलंय. त्यात म्हटलंय की, कोणत्याही प्रवाशाने सूचनांचं पालन केलं नाही, तर विमान कंपनीकडून प्रवाशाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. 

DGCA ने म्हटलंय की, विमान कंपन्यांनी प्रवासादरम्यान तोंडाचं मास्क योग्य प्रकारे परिधान केलं आहेत याची खात्री करावी लागेल आणि विविध प्लॅटफॉर्मद्वारे योग्य स्वच्छता सुनिश्चित करावी लागेल.

जूनमध्ये जारी केलेल्या परिपत्रकाची दखल घेत विमान वाहतूक नियामकाने त्याचं काटेकोरपणे पालन करावं, असं सांगितलंय. जूनमध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, केवळ अपवादात्मक परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव परवानगी मिळाल्यास फेस मास्क काढले जाऊ शकतात. या आदेशानुसार विमानतळांना पाळत वाढवण्यास सांगण्यात आलं होतं.