पालक की मेथी, तुमच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर कोणती भाजी,जाणून घ्या

आरोग्यासाठी जास्त फायदेशीर भाजी कोणती?

Updated: Oct 27, 2022, 11:17 PM IST
पालक की मेथी, तुमच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर कोणती भाजी,जाणून घ्या title=

मुंबई : हवामान बदलानंतर नागरीकांच्या आहारातही बदल होतो. जसं आता हिवाळा सुरु होणार आहे. हा ऋतू सुरु होताच नागरीक जास्त पालेभाज्या खायाला सुरुवात करतात. मात्र कोणती पालेभाजी आपल्यासाठी योग्य आहे, हे खुप लोकांना माहित नसत. त्यामुळे या बातमीत तुम्हाला सांगणार आहोत, तुमच्यासाठी कोणती भाजी योग्य असणार आहे ते. 

या ऋतूत लोकांना पालक आणि मेथी खायला आवडते. पालक आणि मेथी या दोन्हींचे वेगवेगळे फायदे आहेत. पण तरीही पालक (Spinach) आणि मेथीमध्ये (fenugreek) कोणती हिरवी पालेभाजी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे असा प्रश्न विचारला गेला असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आमच्या या बातमीत मिळेल.

पालकमध्ये पोषक तत्व

जेव्हा कोणाला आयरनची कमतरता असते तेव्हा पालक (Spinach) खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते. पालकमध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सही भरपूर असतात. इतकेच नाही तर पालकमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के सारखी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. 

पालकमध्ये (Spinach) असलेले पोषक तत्व तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात, तर बद्धकोष्ठता आणि कॅन्सर सारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

मेथीतील पोषक घटक

जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेल्या मेथीमध्ये (fenugreek) कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. मेथीचा वापर केल्याने रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. याशिवाय मेथीमुळे तुमची रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते. हिवाळ्यात मेथी (fenugreek) खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

कोणती भाजी खाल्ली पाहिजे?

ज्या लोकांना रक्त पातळ होण्याची समस्या आहे, त्यांनी पालक (Spinach)  खाणे टाळावे. पालक रक्त गोठण्यास मदत करते. तसेच मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पालक खाऊ नये.

जर तुम्ही कमी कॅलरी आहार घेत असाल तर पालकऐवजी मेथी (fenugreek) खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. पालकपेक्षा मेथीमध्ये कार्बचे प्रमाण कमी असते, तर प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. 100 ग्रॅम मेथीमध्ये 2.9 ग्रॅम कर्बोदके आणि 4 ग्रॅम प्रथिने असतात, तर 100 ग्रॅम पालकमध्ये 6 ग्रॅम कार्ब आणि 2 ग्रॅम प्रथिने आढळतात.

पालकपेक्षा (Spinach) मेथीमध्ये (fenugreek) कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळेच मेथी खाणे हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.