मुंबई : दात दुखणं ही समस्या अनेकांना सतावते. कडक पदार्थ किंवा गरम खाल्ल की अचानक दातामध्ये वेदना होतात. दरम्यान दातदुखीमागे अनेक कारणं असू शकतात. दातदुखीच्या त्रासाने जेवताना देखील त्रास जाणवतो. इतकंच नाही तर आपल्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो.
दरम्यान तुम्ही काही घरगुती उपायांनी दातदुखीच्या त्रासपासून मुक्त होऊ शकता. परंतु जर वेदना काही दिवस राहिली तर डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक आहे.
पुदीनाचा वापर दातदुखी तसंच हिरड्यांची जळजळ कमी करतं. त्याचप्रमाणे संवेदनशील हिरड्या शांत करण्यासही पुदीना मदत होते. तुम्ही पेपरमिंटच्या तेलाचाही वापर करू शकता.
दातांच्या समस्येवर मीठाच्या पाण्याने गुळण्या करणं हा एक घरगुती उपाय मानला जातो. यामध्ये तुम्ही कोमट पाण्यात थोडं मीठ मिसळा आणि ते माऊथ वॉश म्हणून वापरा. दातदुखी असताना दिवसातून 2-3 वेळा हे पुन्हा करू शकता.
दातांच्या दुखण्यावर एक उत्तम आणि जुना वापरला जाणारा उपाय म्हणजे लवंग. लवंग केवळ वेदना कमी करत नाही तर सूज देखील कमी करण्यास मदत करते. वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही विविध प्रकारे लवंग वापरू शकता. यामध्ये लवंगच्या गरम चहाचं सेवन करु शकता. याशिवाय बाधित भागाला तुम्ही लवंगाचं तेलही लावू शकता.
लसूणीमध्ये बॅक्टेरिया विरोधात गुणधर्म असतात. हे गुणधर्म बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. तुम्ही लसणीचा चहा बनवू शकता किंवा लसणाच्या ताज्या पाकळीचं सेवन करु शकता. शिवाय दात दुखत असलेल्या ठिकाणी लसूण पेस्ट देखील लावू शकता.