चष्म्याच्या वापरामुळे नाकपुडीवरील डागांवर घरगुती उपाय

आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो.

Updated: Sep 11, 2019, 06:45 PM IST
चष्म्याच्या वापरामुळे नाकपुडीवरील डागांवर घरगुती उपाय title=

मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो. चष्म्याची समस्या आता लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तिंपर्यंत सामान्य झाली आहे. टी व्ही पाहाण्याचे अतीप्रमाण, सतत मोबाईलचा वापर. कामाच्या ठिकाणी संगणकाचा वापर त्यामुळे चष्म्याची गरज हमखास भासते. त्याचप्रमाणे सतत चष्मा लावल्यामुळे नाकपुडीवर काळे डाग येतात. ते नष्ट करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. ही समस्या घरगुती उपाय केल्याने सुद्धा दूर होवू शकते.
 
- संत्र्याची साल उन्हामध्ये सुकवा. सुकवलेल्या सालीची पूड करा. यामध्ये दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट नियमित नाकाजवळ लावा. 

- चमचाभर लिंबाच्या रसामध्ये थोडं पाणी मिसळा. या मिश्रणामुळे नाकपुडीवरील काळे डाग दूर होईल.

- बदामाचं तेल रात्री झोपण्यापूर्वी नाकपुडीजवळ लावा. सकाळी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. 

- घरगुती उपायांसोबतच नाकपुडीवर चष्मांच्या नोझपॅडमुळे पडणारे डाग हटवण्यासाठी ते नियमित आणि काही ठराविक कालांंतराने बदलणं गरजेचे आहे.