या ब्युटी टिप्स तुम्हाला नक्कीच माहिती नसतील!

सुंदर असावे, दिसावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी या टिप्स अतिशय उपयुक्त ठरतील. 

Updated: Apr 15, 2018, 07:23 AM IST
या ब्युटी टिप्स तुम्हाला नक्कीच माहिती नसतील! title=

मुंबई : सुंदर असावे, दिसावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी या टिप्स अतिशय उपयुक्त ठरतील. या नव्या टिप्स असून याबद्दल तुम्ही पूर्वी ऐकले नसेल. तर मग या टिप्स नक्की ट्राय करुन बघा. 

#1. तुमचे केस पातळ आहेत का? असतील तर काळजी करु नका. कारण ही आजकालची सामान्य समस्या झाली आहे. केस पातळ असल्यास पार्टिंग करताना थोडे आयशॅडो लावा. त्यामुळे केसांना हेव्ही लूक येईल.

#2. पिंपल्सपासून सुटका मिळवायची असल्यास अल्कोहोल कंन्टेट अधिक असलेला फेसवॉश वापरा. त्यामुळे पिंपल्स लवकर सुकतील आणि चेहऱ्यावरील डागही कमी होतील.
अंटीबायोटीक, सिगरेट आणि कॉफीचे अधिक सेवन यामुळे दात पिवळे होतात. त्यामुळे आत्मविश्वास खालावतो. काहीसे असहज होते. दात पिवळे असल्यास टुथपेस्टमध्ये थोडा बेकींग सोडा मिसळून ब्रश करा. पिवळेपणा दूर होईल.

#3. जर तुम्ही तुमच्या कोरड्या ओठांमुळे त्रस्त असाल तर पेपरमिंट ऑईलचे काही थेंब लिप ग्लॉसवर घाला आणि ओठांना लावा. त्यामुळे ग्लॉसमध्ये नैसर्गिक थिकनेस येतो आणि ओठ लवकर कोरडे पडत नाहीत.

#4. आयलायनर पसरणे ही तर प्रत्येक मुलीची समस्या आहे. हे टाळण्यासाठी आयलायनर पेन्सिल हेअर ड्रायरने सुकवा आणि मग लावा. त्यामुळे लायनर पसरणार नाही.

#5. उन्हाळ्यात घाम अधिक येतो. त्यामुळे परफ्यूम अगदी महत्त्वाचा. पण त्याचा सुगंध दिर्घ काळ टिकत नाही. अशावेळी परफ्यूम लावण्यापूर्वी त्वचेवर थोडेसे व्हॅसलीन लावा. त्यामुळे सुगंध दिर्घ काळ टिकून राहिल.