Heart Attack येण्यापूर्वी शरीरात ही लक्षणे दिसतात, जाणून घ्या

तुमच्याही शरीरात ही लक्षणे दिसत नाहीयेत ना? वाचा ही लक्षणे काय आहेत? अशी लक्षणे असतील तर त्वरीत डॉक्टरांना दाखवा  

Updated: Aug 23, 2022, 01:34 PM IST
Heart Attack येण्यापूर्वी शरीरात ही लक्षणे दिसतात, जाणून घ्या title=

मुंबई : बिग बॉस 14 फेम आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोनाली फोगट म्हणा राजू श्रीवास्तव म्हणा या सर्वांना हृदयविकाराचा झटका आला.एकूणच काय तर अनेकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नेमका हृदयविकाराचा झटका कधी येतो व हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुमच्या शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊयात. 

हृदय हा आपल्या शरीराचा सर्वांत महत्वाचा भाग आहे. आपले हृदय निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. हृदयाच्या गतीमध्ये थोडासा बदल झाल्यास आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सर्वप्रथम रुग्णाला कोलेस्ट्रॉल (Cholesterol)  आणि रक्तदाबाशी (Blood Pressure)  संबंधित समस्या असतात. आणि नंतर या समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. दरम्यान 

कधी येतो झटका?
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा ब्लॉक होतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. कधीकधी हे कोरोनरी धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल आणि चरबी जमा झाल्यामुळे देखील होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना कोरोनरी धमन्या म्हणतात. आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की, तुम्‍हाला हार्ट अटॅकची लक्षणे दिसल्‍यास, त्‍याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.

लक्षणे काय आहेत? 
विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपल्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. ही लक्षणे दिसताच तुम्ही ताबडतोब सावध व्हावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला छातीत दुखणे, जबडा किंवा दातांमध्ये दुखायला लागतं, श्वास घेण्यास अडचण येते, घाम येणे, गॅस बनणे, चक्कर येणे, डोके फिरणे, अस्वस्थ वाटणे आणि मळमळ अशा तक्रारी सुरू होतात.

कोणत्या वयात हृदयविकाराचा झटका येतो?
हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयाच्या व्यक्तीला येऊ शकतो, परंतु 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. 

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)