Heart Attack Due To Smog: हिवाळ्यात धुके पडत असते.या धुक्यामुळे समोरचं काहिच दिसत नाही. हे धुके प्रत्येकासाठीच चांगले असु शकते असे सांगता येत नाही. कारण हे धुके घातक ही असू शकतात. जे हद्याचे रूग्ण (Heart Attack) आहेत, त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. कारण धुके (Smog) आणि प्रदूषणापासून जे मिश्रण बनते स्मॉग (Smog), हे स्मॉग धोकादायक ठरू शकते. त्यामुळे यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, हे जाणून घेऊयात. (smog is dengerous for heart disease start this work now always)
धुके हे हृदयाच्या (Heart Attack) आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याशिवाय ते फुफ्फुसांनाही नुकसान पोहोचवते. त्यामुळे या धुक्यापासून हृदयाच्या रूग्णांनी दुरच राहिलेले बरे,नाहीतर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. दरम्यान या धोकादायक धुक्यापासुन स्वत:चा कसा बचाव करावा. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्मॉग हा वायू प्रदूषणाचा एक प्रकार आहे. त्याच्या संपर्कात आल्याने श्वसन आणि हृदयाशी (Heart Attack) संबंधित आजारांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडणे बंद करा. यासोबतच मोकळ्या ठिकाणी व्यायाम करणे टाळावे.
जर तुमचे बजेट असेल तर घरात एअर फिल्टर नक्की लावा. याशिवाय बाहेरील हवेत श्वास घेणे टाळावे. बाहेर पडताना मास्क वापरण्याची खात्री करा. घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. त्यामुळे बाहेरची हवा घरात येणार नाही.
हिवाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्या. ब्रोकोली, कोबी, ब्रुसेल्स स्प्राउट्स यांसारख्या अँटी-ऑक्सिडंटने युक्त पदार्थांचा दररोज समावेश करा. जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)