Corn Flour For Glowing Skin : प्रत्येकालाच सुंदर दिसायचं असत, नितळ, तुकतुकीत स्किन (Spotless Skin) मिळण्यासाठी बरेच घरेलू उपाय आपण करत असतो इतकंच काय तर बाजारात आलेले महागडे ब्युटी प्रोडक्ट्ड्स (beauty products) वापरत असतो, शिवाय पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करत असतो, पण बरयाचदा इतका सगळं करूनही हवी तशी सुंदर त्वचा मिळत नाही आणि मग आपण हताश होऊन जातो, आत्मविश्वास गमावून बसतो बऱ्याचदा केमिकलयुक्त प्रोडक्ट्स (chemical products) वापरल्याने त्वचा काही वेळापुरती छान दिसते पण कालांतराने मात्र त्वचा काळवंडते.
पण या सर्वांवर कायमचा उपाय हवाय तर मग चला या टिप्स एकदा करून पाहूया, (skincare tips)
हा फेसपॅक (facepack) वापरून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता यासाठी 2 चमचे मक्याचं पीठ घ्या त्यात 1 चमचा मध आणि 3 चमचे दूध घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या या पेस्टला चेहऱ्यावर लावा आणि ५-१० मिनिट राहूद्या या नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका . असं केल्याने चेहरा काही दिवसातच चमकू लागेल.
या फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला २ चमचे मक्याचं पीठ लागेल यात १ चमचा दही घाला आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या हे लक्षात असुद्या कि हे पेस्ट तुम्हाला घट्टसर मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर हि पेस्ट लावा आणि ५-१० मिनिटं राहूद्या, यानंतर सध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. असं केल्याने तुमची त्वचा मऊ आणि तुकतुकीत होऊ लागेल .
मक्याच्या पिठात प्रोटीन आणि बरीच मिनरल्स असतात. ज्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर त्यापासून तुम्हाला आराम मिळेल. हा फेसपॅक चेहऱ्यावरील तेल आणि घाण शोषून घेऊन तुमची त्वचा सुंदर आणि टवटवीत होते.