मुंबई : उन्हाळा कितीही असह्य झाली तरी आंब्यासाठी त्याची सगळे आतुरतेने वाट बघतात. आंबा आवडत नसलेली व्यक्ती दुर्मिळच असेल. आंबा म्हणताच तोंडाला पाणी सुटणाऱ्या लोकांनी आंब्याचे फायदे नक्की जाणून घ्या. तुमच्या आवडीचे हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. या गोड फळात व्हिटॉमिन ए, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम यांसारख्या पोषकघटकांना खजिना असतो. पण आंब्यामुळे आरोग्याचे काही नुकसानही होते. पाहुया आंब्याच्या अधिक सेवनाने उद्भवणाऱ्या समस्या...
आंबा खाल्यानंतर तोंडात एक तरल पदार्थ तयार होतो. त्यामुळे आंबा खाल्यानंतर तोंड नीट साफ केले नाही तर तोंडाची चव बिघडते. त्याचबरोबर दाद, खाज यांसारख्या समस्यांना समोरे जावे लागेल. इतकंच नाही तर हा पदार्थ गळ्यात गेल्यास खोकला, गळ्याला सूज येणे, दुखणे असे त्रास होऊ शकतात.
आंब्यात अनेक पोषकघटक असले तरी त्यामुळे काही लोकांचे त्रास पूर्वीपेक्षा अधिक वाढतात. पचनविकार असल्यास आंब्याचे कमी प्रमाणात सेवन करा. कारण आंब्याच्या अधिक सेवनामुळे लूज मोशन, आव यांसारख्या समस्या उद्भवतात.
आंब्याचा एकच हंगाम असल्याने आंबा मनसोक्त खावा, असे वाटते. त्यामुळे आंबा खाण्याचा मोह आवरता येत नाही. पण आंबा हे एक उष्ण फळ आहे. याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे चेहऱ्याची चमक टिकवण्यासाठी आंब्याचे सेवन मर्यादीत ठेवा.
आंबा अधिक प्रमाणात खाल्याने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात आंबा खावू नका. दिवसातून जास्तीत जास्त दोन आंबे खा. आंब्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा खाण्याचा मोह आवरता घ्यायला हवा.