सतत पाय हलवण्याची सवय देते 'या' आजाराचे संकेत !

अनेक लोकांना बसल्याबसल्या सतत पाय हलवण्याची सवय असते. 

Updated: May 6, 2018, 05:26 PM IST
सतत पाय हलवण्याची सवय देते 'या' आजाराचे संकेत !  title=

 मुंबई : अनेक लोकांना बसल्याबसल्या सतत पाय हलवण्याची सवय असते. खरंतर ही सवय कोणत्या गंभीर आजाराचे संकेत असेल असे सामान्यांच्या लक्षातदेखील येणार नाही. पण ही सवय शरीरात सुरू झालेल्या बिघाडांचे संकेत देत असते. त्यामुळे तुम्हांला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला ही सवय असल्यास त्याकडे काना डोळा करू नका.  

 सतत पाय हलवण्याची सवय कोणते संकेत देते?  

 शरीरात आयर्न ( लोह) घटकाची कमतरता निर्माण झाल्यानंतर पाय आपोआप हलण्याची सवय सुरू  होते. त्यामुळे रक्तातील आयर्नची पातळी तपासून पहाणं गरजेचे आहे. त्यानुसार आहारात बदलही करावे लागतील. 
 
 अनेकांना बसल्याजागी, झोपल्यानंतर पाय हलवण्याची सवय असते. यामागे रेस्टलेस सिंड्रोम हे एक कारण असू शकते. रेस्टलेस सिंड्रोमच्या समस्येमध्ये सतत  पाय हलवणे, सुई टोचल्यासारखे जाणवणे, खाज येणे अशी लक्षण आढळतात.  
 
अमेरिकेत सुमारे 10 % लोकांना हा त्रास होतो. हा त्रास वयाच्या कोणत्याही  टप्प्यामध्ये होऊ शकतो. मात्र प्रामुख्याने हा त्रास तरूणांमध्ये आढळत आहे. 
 
 गरोदर स्त्रीयांमध्येही शेवटच्या टप्प्यातील तीन महिन्यात हा त्रास आढळतो. मात्र प्रसुतीनंतर महिन्याभरात हा त्रास कमीदेखील होतो. 
 
 रेस्टलेस सिंड्रोम हा नर्व्ह सिस्टम म्हणजेच मज्जासंस्थेशी निगडीत असतो. यामुळे पाय हलवण्याची क्रिया सुरू झाली की शरीरात डोपामाईन हार्मोन  वाहण्यास सुरूवात होते. या हार्मोनमुळे एक काम पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा होते.  
 
 रेस्टलेस सिंड्रोमला स्लिप डिसऑर्डरही म्हणातात.