Sex Phobia : आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीला (Fear) घाबरत असतो. मात्र आपल्या सर्वांमध्ये काही लोकं अशी देखील असतात, जी सेक्सला घाबरत (Sex Phobia) असतात. आता तुम्ही म्हणाल सेक्सला कसं कोणी घाबरत असेल? सेक्स ही एक आनंद देणारी गोष्ट असते, मग त्याची भीती एखाद्या व्यक्तीला कशी वाटू शकेल?
काही लोकांना Sex Phobia ही समस्या देखील असते. या फोबियाची कारणं सामान्यपणे धार्मिक किंवा सामाजिक असू शकतात. याव्यतिरीक्त लैंगिक शोषण, प्रदर्शन चिंता किंवा इतर कोणत्याही आघातांमुळे हा फोबिया असू शकतो.
या फोबियासंदर्भात एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे, या सर्व गंभीर परिस्थिती आहेत आणि यापैकी कोणत्याही फोबियाने ग्रस्त असलेले लोक त्यांच्यावर मात करण्यासाठी काहीही करू शकत नाही. यामध्ये वैद्यकीय मदत लोकांना या फोबियांवर मात करण्यात फायदेशीर शकते. मात्र यातून पूर्ण बरे होण्याची कोणतीही हमी नाहीये.
एरोटोफोबिया हा मुळात सेक्स संबंधित वस्तू किंवा कार्याशी भीती वाटते. या फोबियाने ग्रस्त व्यक्ती सेक्स किंवा शारीरिक संबंधांविषयी बोलताना देखील घाबरतात. अशा व्यक्ती सेक्सबाबत बोलत देखील नाही.
जेनोफोबिया ही सेक्सचा शारीरिक आणि मनोवैज्ञानिक भीती आहे. या भीतीपोटी स्त्री-पुरुष जवळीक साधण्यास घाबरतात. याशिवाय ते लैंगिक संबंध ठेवण्यास घाबरतात.
या फोबियाने ग्रस्त असलेले लोकं नग्नतेला घाबरतात. कोणत्याही परिस्थितीत असणारी नग्न व्यक्तीला पाहण्याला हे व्यक्ती घाबरतात. या व्यक्तींनाा वाटतं की, आपण पार्टनरला नग्न अवस्थेत पाहिलं म्हणजे खूप मोठी चूक केली. या भीतीपोटी अशा व्यक्ती अंधारात सेक्स करतात किंवा सेक्स करतच नाहीत.
हाफेफोबिया याला चिराप्टोफोबिया या नावाने देखील ओळखलं जातं. यामध्ये व्यक्तीला स्पर्शाची भीती वाटते. इतकंच नाही तर या व्यक्तींना गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्यास देखील असहजता वाटते.
हा एका पद्धतीचा किसींग फोबिया आहे. यामध्ये लोकं सेक्सदरम्यान पार्टनरला किस करताना घाबरतात. मात्र त्यांना सेक्स करण्यामध्ये कोणतीही भीती वाटत नाही.